त्योदय अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये एप्रिल ते जुन 2020 साठी साखरेचे १२१७.७९ क्विंटल  नियतन मंजुर


बीड,.........अंत्योदय अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये ४०५२६ कार्डधारक असुन त्यांना प्रती कार्ड 1 किलो या प्रमाणे साखरेचा लाभ मिळणार आहे, त्याकरिता  एप्रिल 2020 ते जुन 2020 या कालावधी साठी मागिल शिल्लक धरून १२१७.७९ क्विंटल  नियतन मंजुर करण्यात आले आहे अंत्योदय अन्न योजने अंतर्गत अन्नधान्या सोबत साखरेचे वितरण केले जात आहे, असे राहुल रेखावर जिल्हाधिकारी बीड यांनी कळविले आहे. 
            स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थांना प्रति कार्ड / प्रति कुटुंब १ किलो साखर देण्यात येत आहे. साखरेची वाटप ही प्रती 1 किलो २० रुपये फक्त या सवलतीच्या दराप्रमाणे करण्यात येतआहे. अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. 
            जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दकानदार यांनी लाभार्थ्यांना रु.20 प्रति किलो पेक्षा जास्तीचा दर आकारण्यात येवु नये, जास्तीचा दर आकारल्यास आपण जनतेची फसवणूक करत आहात असे समजून आपल्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल आणि भारतीय दंड साहितेमधील कलम ४२० प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
            शासन धोरणानुसार साखर फक्त अंत्योदय अन्न योजने साठी लागू असल्याने इतर योजनेतील कार्डधारकांनी देखील साखर देण्याबाबत स्वस्त धान्य दुकानदाराकडे आग्रह धरू नये व साखर अनुज्ञये नसताना तक्रार नोंदवु नयेत. 
       सदरील साखरेचे वाटप e-POS मशीनद्वारेच करावे तसेच वाटप करतांना मशीन मधून जी पावती निघते ती पावती पात्र कार्डधारकांसाठीची आहे आणि ती पावती प्रत्येकाने स्वतःचा हक्क समजुनच मागून घेतली पाहिजे. या पावतीवर संबंधित कार्डधारकाला किती धान्य/ साखर देण्यात येत आहे आणि त्यासाठी त्याने किती रक्कम दुकानदाराला द्यावी हे दिलेले असते. जर राशन दुकानदार ही पावती देत नसेल तर तो तुमचे धान्य/साखर चोरत आहे असे तुम्ही समजले पाहिजे आणि त्यांच्या विरुद्ध तक्रार केली पाहिजे असे आवाहन केले आहे.
०००


 


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत