राज्य शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीत सूट

धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांना यश


राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने केली होती मागणी


बीड .......-  राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने केलेल्या मागणीनुसार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता राज्य सरकारमधील सर्व कार्यालयांमध्ये सेवा देत असलेल्या दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना लॉक डाऊनच्या काळात कार्यलयीन उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे. 


शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला असुन सर्व शासकीय कार्यलयातील दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांना आता उपस्थितीतून सूट देण्यात आली आहे.


सामान्य व्यक्तीच्या तुलनेत दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, अशा वेळी कोरोना सारख्या महाभयंकर आजाराची लागण होण्याची भीती अधिक असते. तसेच राज्यात लागू असलेल्या संचारबंदी मुळे वाहतुक व दळणवळणाच्या अडचणीही आहेत; याच पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अशा सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात उपस्थित राहण्यातुन लक डाऊनच्या काळात सूट द्यावी अशी आग्रही मागणी केली होती. 


अखेर धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करत आजपासून सर्व कार्यालयातील दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्याना लॉक डाऊन संदर्भात पुढील आदेश येईपर्यंत उपस्थित राहण्यापासून सूट जाहीर केली आहे. 


या निर्णयासह यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ना. मुंडे यांचे व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.
00000


 


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत