जिल्ह्यात समूहाने अडकलेले विस्थापित लोकांना त्यांच्या संबंधित राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जाण्याकरिता परवानगी देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित- जिल्हाधिकारी राहुल रेखावार


बीड, ........ लॉकडाऊनच्या कालावधीत  बीड जिल्ह्यात समूहाने अडकलेले विस्थापित कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना, लोकांना त्यांच्या संबंधित राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जाण्याकरिता कार्यपद्धती निश्चित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत शासनाने यासाठी आवश्यक असणारी परवानगी देण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून प्राधिकृत केलेले आहे.
            त्यामुळे बीड जिल्ह्यातून राज्यांतर्गत, परराज्यात वरिल प्रमाणे (वैयक्तिक व्यक्ती वगळता) नमूद लोकांना जाण्यासाठी करावयाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. 
संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे तहसीलस्तरावर अशा लोकांची यादी तयार करून तालूका वैद्यकीय अधिकारी या यादीप्रमाणे विहीत नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करावे, सदरचे वैद्यकीय प्रमाणपत्र हे तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा कोणत्याही नोंदणीकृत डॉक्टर (Registered medical practitioner) यांनी दिल्यानंतर 
तपासणीत कोरोना रोगाचे लक्षणे नसलेल्या व्यक्तींची यादी ते ज्या जिल्हा, राज्यातील आहेत त्या राज्य, जिल्हा, तालूका, गांव या
पद्धतीने तयार करण्यात येणार आहे.
            सदर व्यक्तीं समूह ज्या वाहनाने प्रवास करणार असतील त्या वाहनाचा प्रकार, क्रमांक, वाहन चालकाचे नांव, वाहन चालकाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, ओळखपत्र इत्यादी सह प्रवासासाठी पात्र व्यक्तींची यादी, वैद्यकीय प्रमाणपत्र व वाहनाचा तपशील इत्यादी माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष  मार्फत व्यक्तींचा समूह ज्या राज्यात/जिल्ह्यात जात असेल त्याच्या संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडुन संमती प्राप्त झाल्यानंतर त्या जिल्ह्यात पाठविणेसाठी प्रमाणित कार्यपद्धतीनूसार पाठविण्याची पुढिल कार्यवाही होईल.
               या आदेशाची अवाज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंडसंहिता 1860 (45) याच्या कलम 188 शिक्षेसपात्र अपराध केला असे मानण्यात येईल आणि दिवाणी व फोजदारी कार्यवाही करण्यात येईल.
                  ००००


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत