विषम दिनांकास सकाळी ०७.०० ते द.२.०० या कालावधीत किराणा दुकानासह सर्व किरकोळ विक्रेत्यांची दुकाने उघडण्यास परवानगी-जिल्हाधिकारी राहुल रेखावार


Needly App चा सर्व किराणा
दुकानदार व नागरिकांनी अधिकाधिक वापर करुन घराबाहेर येणे टाळण्याचे आवाहन


यासह विविध बाबीांचीे सूट यापूर्वीच्या आदेशा प्रमाणे लागू 


बीड,....... जिल्ह्यात दिनांक १३ में २०२० रोजी पासून पूढील आदेशापर्यंत विषम दिनांकास सकाळी ०७.०० ते द.२.०० या कालावधी मध्ये ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारची किरकोळ विक्रेत्यांची दुकाने (किराणा दुकानासह, परंतु भाजीपाला व फळे यांची दुकाने वगळून ) उघडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.


सदर आदेशा नुसार जिल्हाधिकारी बीड, श्री. रेखावार यांनी पुढील निर्देश लागू आहेत


१.विषम दिनांकास सकाळी ०७.०० ते द.२.०० या कालावधी मध्ये ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारची किरकोळ विक्रेत्यांची दुकाने (किराणा दुकानासह, परंतु भाजीपाला व फळे यांची दुकाने वगळून ) उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे. 
मा.उच्च न्यायालय खंडपीठ  औरंगाबाद यांच्या जनहित याचिका क्रमांक १०५८९/२०२०
मधील दिनांक १२/०५/२०२० रोजीच्या निर्देशान्वये या कार्यालयाचे Needly App वापराविषयीच्या दिनांक ०९ में २०२० रोजीच्या संपूर्ण आदेशास कसल्याही प्रकारचा प्रतिबंध नसला तरीही त्याचा वापर सर्व किराणा
दुकानदारांच्या सहकार्याने सुरु करण्यात येत आहे. नागरिकांनी या अॅपचा अधिकाधिक वापर करुन घराबाहेर येणे टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करावा


२.सर्व घाऊक (whole sellers) विक्रेत्याची दुकाने विषम दिनांकास दुपारी ३.०० वा.नंतर आणि सम दिनांकास पूर्ण दिवस खुली राहण्यास परवानगी देण्यात येत आहे. याच काळामध्ये किरकोळ दुकानांना त्यांच्या दुकानात
घाऊक विक्रेत्याकडून किंवा अन्य मार्गाने सामान आणण्यासाठी ही परवानगी देण्यात येत आहे.


३.विषम दिनांकास सकाळी ६.३० ते दु.२.३० वा या काळामध्ये शहरी भागामध्ये सर्व प्रकारच्या मालवाहू गाडया (पिकअप व्हॅन, छोटा हत्ती. ट्रक इ.सह सर्व) यांना प्रवेशास मनाई असेल.


४.वाहतूक पास असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस चार चाकी,अॅटो, दुचाकी यांच्या वापरास शहरी भागात संपूर्ण मनाई असेल.परंतु शासकीय शाळा,वसतिगृहे इत्यादी बंद असणा-या शासकीय आस्थापनावरील कर्मचारी वगळून इतर सर्व शासकीय कर्मचारी, बँक कर्मचारी व इतर जिवनावश्यक सेवेतील व्यक्ती यांना सवलत
देण्यात येत आहे.


५. वाहनास इंधन यापूर्वीचे निर्देशाप्रमाणेच देण्यात यावे.


६.वधू व वरा व्यतिरिक्त १० पेक्षा जास्त व्यक्ती जमणार नाहीत, अशा घरगुती विवाहास परवानगी देण्यात येत आहे.


७.केश कर्तनालय, ब्यूटी पार्लर यांच्यासाठी याआधीचे आदेश कायम राहतील.


८. जी कामे या आधी कोणत्याही विषम दिनांकास सकाळी ७.०० ते ९.३० मध्ये अनुज्ञेय होती. ती सर्व कामे आता सर्व विषम दिनांकांना सकाळी ०७.०० ते दु.२.०० वा या काळात (बँकेसह) अनुज्ञेय राहतील,


९.शहरी भागातील व्यावसायिक परिसरातील सर्व प्रकारची शासकीय तसेच खाजगी बांधकामे व रस्त्यांची कामे विषम दिनांकांस सकाळी ६.३० ते दु.२.३० ही वेळ वगळता करता येतील, परंतु या कामामुळे कोणत्याही प्रकारे कोणत्याही वेळी वाहतूकीस अडथळा अथवा गर्दी होऊ नये.


या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत असताना नागरिकांनी कोठेही गर्दी करु नये, सामाजिक अंतराचे भान ठेवावे, मास्क व सेंनीटायझरचा वापर करावा व कोवीड-१९ चा विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सर्व आवश्यक ती काळजी घ्यावी आणि केवळ आवश्यकता असेल तेव्हांच घराबाहेर यावे. 


बीड जिल्यात फौजदारी प्रक्रिया दंड प्रक्रिया कलम १४४ (१७ (३) अन्वये दिनांक १७ में २०२० रोजी रात्री १२.०० वा. पर्यत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.