विवाह इच्छुकांनी लॉकडाऊनमध्ये चालावी परिवर्तनाची सप्तपदी*

 


 *वधु-वरांसाठी नोंदणीकृत विवाह हा होईल सुंदर पर्याय*


   कोरोना संसर्गाच्या साथीशी सगळा देश लढतो आहे जागतिक स्तरावर पसरलेल्या या साथीमुळे जगाची तसेच आपल्या देशातील दैनंदिन व्यवहारांची घडीे विस्कळीत झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संसर्गावर नियंत्रण राखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणीत आहेत


     या संघर्षाच्या वातावरणात शासन व प्रशासनाच्या बरोबर सामाजिक संघटना उद्योग जगत आणि अनेक व्यक्ती आपल्या परीने समाजासाठी व नागरिकांसाठी पुढे येऊन मदत करीत आहेत. याच वेळी अनेक ठिकाणी युवक-युवती आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी विवाहाच्या वेदीवर देखील उभे आहेत त्यांच्या समोर आता काय करावे असा एक मोठा प्रश्न देखील उभा आहे.


       या कठीण काळात विवाह इच्छुकांना काही आधुनिक विचार करून पाऊल टाकले तर नक्कीच  देश आणि समाजासाठी व आपल्या भोवतालच्या व्यक्तींसाठी या संसर्गापासून बचावासाठी एक मोठी सप्तपदी चाललो आहोत याचे समाधान त्यांना मिळेल


      सध्या अनेक घरामध्ये मुला मुलीचे विवाह करण्याची लगबग चालु आहे .परंतु लॉकडाऊन मुळे विवाह समारंभ पारंपारीक पध्दतीने  करताना प्रतिबंधात्मक तरतूदीचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो .यामुळे अशा वधु वरांसाठी नोंदणीकृत विवाह (Registered marriage) हा एक चांगला पर्याय आहे 


*विशेष विवाह कायदा १९५४* अन्वये विवाह नोदणीसाठी लागणारी आवयक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. 
१. वधु व वर यांचा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला , पक्षकार अशिक्षित असेल किंवा जन्माची नोंद कोठेही नसेल तर जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील वैद्यकीय दाखला वधु चे वय १८ वर्ष व वराचे वय २१ वर्ष पुर्णअसणे आवश्यक आहे.
तसेच वधु व वर यांचा रहिवाशी पुरावा उदा स्वतच्या नावाचे विज देयक /दुरध्वणी देयक मिळकत कर पावती लिव्ह अॅण्ड लायसन्स ची प्रत
२. वधु किंवा वर घटस्फोटीत असल्यास घटस्फोटासंबधीतचा कोर्ट हुकुमनामा (डिक्री)
३. वधु हि विधवा किंवा वर हा विधुर असल्यास पुर्वीच्या जोडीदाराचा सक्षम प्राधिकारी यांचे कडील मृत्युचा दाखला
४. आवश्यक तीन साक्षीदारांची ओळखपत्रे व रहिवास पुरावा सर्व पुरावे साक्षांकीत केलेले असावेत .
५. विशेष विवाहची नोटीस देते वेळी वधु  व वरा पैकी किमान एक पक्षकार विवाह अधिका-याच्या कार्यक्षेत्रात नोटीसच्या दिनांका पासुन मागील सलग ३० दिवस वास्तव्य करीत असला पाहीजे .


*विशेष विवाह पध्दतीने विवाह नोंदवितांना वधु-वर खालील अटी व शर्तीची पुर्तता* करणे आवश्यक आहे .


१.विवाह इच्छुक वधु वरापैकी कोणीही मंदबुध्दी किंवा मनोविकृत नसावेत.
२.विवाह इच्छुक वधु वरा पैकी कोणासही वारंवार वेडयाचे झटके , मिरगी, फोट येत नसावेत.
३.विवाह इच्छुक वधु वरा पैकी कोणीही संतती उत्पत्ती करण्यास अपात्र नसावेत
विशेष विवाह कायदा १९५४ अन्वये लावण्यात येणार विवाह हा या विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in
या संकेज स्थळावर नोंदणी विवाह सेवा या सदराखाली ऑनलाईन विवाह नोंदणीचा अर्ज (नोटीस ) सादर करता येईल.


     विवाह नोटीस दिल्यानंतर विवाहाची नोटीस ३० दिवसात कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास किंवा प्राप्त आक्षेपामध्ये तथ्यांश दिसून न आल्यास नोटीस दिलेल्या दिनांका पासून विवाह अधिकारी ३० दिवस ते ९० दिवसापर्यंत कधीही अर्जदाराच्या सोई प्रमाणे वधु व वर व तीन साक्षीदार यांना कार्यालयात येऊनच विवाह संपन्न करु शकतात.
      याबाबत प्रशासन देखील सर्व पातळीवर आवाहन करत असते व आपल्या मदतीसाठी पुढे येते आहे याचा उपयोग नक्की संबंधितांनी करून घ्यायला हवा. यामुळे परिवर्तनाच्या काळात आपणास चांगल्या बदलांचे साथीदार होता येईल.  याच बरोबर पारंपारिक विवाह समारंभातील आयोजनासाठी होणाऱ्या खर्चाची बचत मुख्यमंत्री मदत निधी व पंतप्रधान मदत निधी देऊन या सत्कार याचे भागीदार होऊ शकतो. असा विचार करून त्यादिशेने काहीजणांनी पावले देखील टाकली आहेत.


        बीड जिल्हा देखील प्रशासनाने सगळ्यांना आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या वधु-वरांना पुढे येऊन नोंदणी विवाह साठी आपण आपल्या वडीलधाऱ्यांची संमती मिळविण्यासाठी राजी करावं असं सांगितलं आहे. व त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद  मिळू लागला आहे. 
          यादृष्टीने आपल्याला, 
*अधिक माहिती हवी असेल तर आपल्या जिल्ह्याचे विवाह नोंदणी अधिकारी अथवा सह निबंधक वर्ग  तथा विवाह अधिकारी यांना खालील क्रमांकावर संपर्क साधावा.*
विवाह नोंदणी अधिकारी श्री एस.ए,पोकळे सह दुय्यम निबंधक वर्ग २ तथा विवाह अधिकारी बीड क्र. १ हे असुन यांचा मोबाईल नंबर ९४२१२७३९००व ९६०४५७९९९९


    मित्रांनो लॉक डाऊनलोड असलेली संचारबंदी व जमावबंदी यासह नियम व कायदे यांचे अडथळे हे व या सर्व तरतुदी पहाता कमीत कमी लोकांसह विवाह करायचा असेल तर नोंदणीकृत विवाह पेक्षा चांगला व सुंदर दुसरा मार्ग खचितच नाही.
      सध्या लोकडाऊनच्या स्थितीमध्ये नागरीकांनी पारंपारीक पध्दतीने विवाह करण्याचा आग्रह न धरता कसलीही गर्दी न करता सर्व नातेवाईकांचे आरोग्य सांभाळून आणि विवाहावर होणार खर्च आणि कर्जाचा डोंगर टाळून कायदेशीर पध्दतीने विवाह करावा आणि सर्व लोकप्रतिनिधीना, सर्वसमाजाच्या संघटक आणि वडीलधा-या व्यक्तीना व जनमानसास समजावून सांगून या मागांचे अनुकरण करण्यास प्रवृत्त करावे आणि प्रशासनास सहकार्य करावे.