जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनानिमित्त.... प्रसार माध्यमातील श्रमिकांना राजयोग फाउंडेशनने दिला आधार


बीड ....
कोरोना महामारी मुळे संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे.या परिस्थितीमुळे श्रमिक, कष्टकरी,स्वाभिमानी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.अश्या कष्टकर्‍यांना सन्मानपूर्वक मदतीची किट राजयोग फाउंडेशनच्या माध्यमातून धूत परिवार उपलब्ध करून देत आहेत.रविवार दिनांक 3 मे रोजी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रसारमाध्यमातील श्रमिक पत्रकार आणि श्रमिक कामगारांना किराणा सामान व अन्नधान्याची किट सन्मानपूर्वक राजयोग फाउंडेशनच्यावतीने पत्रकार संघाच्या पुढाकारातून देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजयजी भोकरे,राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे,मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या सूचनेनुसार बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील श्रमिक पत्रकार आणि गरजवंत कामगारांना योग्य ते सहकार्य दानशूरांनी सन्मानपूर्वक करावे असे आवाहन केले होते.या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत राजयोग फाऊंडेशनचे संस्थापक दिलीपसेठ धूत आणि त्यांचे चिरंजीव नगरसेवक शुभम धूत यांनी मदतीच्या सहकार्याचा हात पुढे केला.जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 3 मे रोजी सायंकाळी 4:30 वाजता सायं दैनिक सांजसुयोग कार्यालयासमोर, सहयोग नगर, बीड येथे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील गरजवंत श्रमिकांना सन्मानपूर्वक अन्नधान्य आणि किराणा सामानाची किट देण्यात आली.यावेळी राजयोग फाऊंडेशनचे नगरसेवक शुभम धूत,पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, यांच्यासह tv9 चे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर,साम टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी विकास माने,मॅक्स महाराष्ट्र चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी विनोद जिरे, देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी मंगेश निटूरकर, लोकपत्रचे जिल्हा प्रतिनिधी नागनाथ जाधव,दैनिक पार्श्वभूमीचे उपसंपादक गोरख मामा चिंचोलकर, दैनिक पुण्यनगरीचे अविनाश वाघीरकर, दैनिक रिपोर्टरचे उपसंपादक रमाकांत गायकवाड,तरुण भारतचे जगन्नाथ देशमुख, प्रेस फोटोग्राफर उत्तम ओव्हाळ, राजयोग फाउंडेशन परिवारातील संजय करवा, गिरीश मुंदडा, अभिजीत आव्हाड,सागर वाहुळ, सुशांत राऊत आदी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सुमारे 30 प्रतिनिधींना जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देण्यात आली.जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.