जिल्ह्यातील १६ कापुस खरेदी केंद्रांवर ग्रेडर नियुक्तीचे आदेश निर्गमित - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड,..... :- जिल्ह्यातील एकुण १६ कापुस खरेदी केंद्रांवर प्रशिक्षित कर्मचारी अधिकारी यांची पुढील आदेशापर्यत ग्रेडर म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी विभागीय व्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या.विभागीय कार्यालय, परळी वै.जि.बीड यांचे नियंत्रणात व सुचनेनुसार ग्रेडींगचे कामकाज दि.२६ मे २०२० पासुन करावे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. 


 


बीड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या. मुंबई यांचे मार्फत शासकिय हमी भावाने कापुस खरेदी सुरु असुन ग्रेडरची संख्या कमी असल्यामुळे प्राथमिक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापुस खरेदी करण्यात विलंब लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कापुस खरेदी केंद्रावर ग्रेडर म्हणुन कृषि विभागाचे कृषि पदवीधर कर्मचारी, अधिकारी यांना कापुस ग्रेडींगचे प्रशिक्षण देऊन हे कर्मचारी, अधिकारी कापुस खरेदी केंद्रावर ग्रेडर म्हणुन नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यांची नावे व नमुद केल्याप्रमाणे संबंधित खरेदी केंद्र यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


 


जिल्ह्यातील कृषि विभागाचे २० कर्मचारी, अधिकारी यांची जिनिंग ट्रेनिंग सेंटर,नागपुर येथे ४ दिवसाचे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली असुन,सदर कर्मचारी,अधिकारी यांनी दि.१५ ते १८ मे २०२० या कालावधीत नागपुर येथे प्रशिक्षण पुर्ण केलेले आहे.


 


विभागीय व्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्या. विभागीय कार्यालय, परळी वै.जि.बीड यांनी कृषि विभागाचे प्रशिक्षित कर्मचारी, अधिकारी यांना कापुस खरेदी केंद्रावर केंद्रप्रमुख, ग्रेडर म्हणुन नियुक्ती देणे बाबत या कार्यालयास विनंती केली होती .


००००