कोविड 19 स्टेट बँक ऑफ इंडियाचा नागरिकांना दिलासा देण्यासाठी विशेष उपक्रम

 


 


 


 शेती आसणि पुरक व्यवयासातील कर्ज कामकाजासाठी आर्थिक समावेशकता व लघु बाजारपेठा विभाग हा खास विभाग


बीड,..... कोविड 19 साथी दरम्यान एसबीआयने आघाडीवर राहून आर्थिक समावेशकता व लघु बाजारपेठा विभाग सुरू केला आहे. निधीच्या दहा टक्के आधारित भांडवल, वित्त भांडवल, सहज कर्ज उपलब्ध करुन देणे, टर्म कर्ज आणि भांडवल फेडीची मर्यादा पुढे ढकलणे या एसएमई कर्जदारांसाठी विशेष उपक्रम आणि कोविड १९ अनुषंगाने सीसीईसीएलच्या इमर्जन्सी क्रेडिट लाईनचा समावेश असल्याचे भारतीय स्टेट बँक( एसबीआय)चे शाखा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्राकाव्दारे कळविले आहे.


 


स्थानिक पातळीवर खास लक्ष देण्यासाठी आणि कामकाज सुरळीत चालवण्यासाठी आर्थिक समावेशकता व लघु बाजारपेठा विभाग( एमआय आणि एमएम विभाग) मध्ये चार स्तरीय रचना करण्यात आली असून मुख्य व्यवस्थापकातंर्गत व्यवस्थापक बिझनेस ऑफिसेस आरबीओ आणि जिल्हा विक्री केंद्राची ही चार स्तरीय रचना पत वितरण यंत्रणा मजबुत करुन लघू कर्जासाठी आवश्यक जलद मंजूरी व वितरण वेळेवर होईल याची खात्री करणार आहे. जिल्हा स्तरावर एकत्रित प्रयत्न करण्यावर प्रमुख भर दिला जाणार असून यामुळे एफआय आणि एमएम नेटवर्कमधील शाखांना सातत्याने विक्री आणि वसुली संदर्भासाठी आवश्यक मदत मिळेल. डीएसएचही कस्टमर सर्व्हिस पॉईन्डस ( सीएसची) मजबूत करण्यावर आणि ग्राहकांना दिल्या जाणा-या सेवांचा दर्जा व उपलब्धता सुधारण्यावर महत्वाची भुमिका बजावणार आहे.     


     


• बँकेतर्फे पॅन भारतातल्या 8000 ग्रामीण आणि निम शहरी शाखांना लघु कर्ज दिले जाणार


 


• शेती आणि लघु कर्जदारांच्या गुतंवणूक पत गरजा पूर्ण करण्यासाठी खास एफआय आणि एमएम विभागाची स्थापना   


 


• नव्या विभागाचे नेतृत्वाची डीएमडी श्रेणी अधिका-याकडे 


 


2 जून 2020 देशातील सर्वात मोठी कर्जपुरवठादार असलेल्या या बँकेने (एसबीआय) हाती घेतलेल्या लक्षणीय पुर्नरचना बॅकेतंर्गत एफआय आणि एमएम विभागाशी स्थापना करण्यात आली असून हा विभाग ग्रामीण व निम शहरी भागातील आर्थिक सर्वसमावेशकता आणि लघु बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत या परिसरातील ग्रहकांना अधिक चांगला अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विभागातंर्गत बँकेतर्फे प्रामुख्याने शेती आणि पूरक उपक्रमांवर तसेच सुक्ष्म/ लघु व्यवयसांसाठी कर्ज दिले जाणार आहे. 


 


ग्रामीण व निम शहरी भागातील सुमारे 8000 शाखांची लघु विभागाला खास सेवा देण्यासाठी निवड करण्यात आली असून या सेवांमध्ये लघु उद्योग आणि शेतक-यांना मायक्रो क्रेडिट पुरवण्याचाही समावेश असेल. बँकेच्या ग्रामीण, निम शहरी, शहरी आणि महानगरातील तब्बल 63000 ग्राहक सेवा केंद्राच्या विस्तृत नेटवर्कव्दारे सेवचा दर्जा आणि बँकिंग सेवांची उपलबधता सुधारण्यासाठी भर दिला जाणार आहे. 


 


 या विभागांच्या शुभारंभ वेळेस एसबीआयचे अध्यक्ष रजनिश कुमार यांनी सांगितले, एसबीआय सर्व क्षेत्रातील आपल्या ग्राहकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे नव्याने अधोरेखित करणारा दिवस अतिशय महत्वाचा आहे. एफआय आणि एमएम विभाग प्रामुख्याने वेगवेगळ्या व्यवसायात अधिक चांगली सेवा देण्यासाठी आणि शाखांतील ग्राहकांबरोबरच्या संवादाचा दर्जा उंचावण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. आर्थिक सर्वसमावेशकतेचा एक भाग म्हणून देशाच्या ग्रामीण भागात राहणा-या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एसबीआयने सुरु केलेला हा महत्वाचा उपक्रम आहे. नव्या एफआय आणि एमएम विभगाव्दारे लघु उद्योग, शेती व पुरक व्यवसायांना आपला व्यवसाय सुरळीतपणे चालवता यावा. विशेषत आतासारख्या कठीण परिस्थितीतही त्यांना यशस्वी होता यावे यासाठी सेवा देण्याची संधी दिली जाणार आहे. एफआय आणि एमएम विभागाची संकल्पना, निर्मिती आणि अंमलबजावणी पूर्णपणे अंतर्गत पातळीवर करण्यात आली आहे. 00000000