व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रकल्प अधिकार्‍याने टाकला स्वतःचा नग्न फोटो

.. बिड... (डी.के.उजळंबकर) 


सोशल मीडिया चा कसा वाईट वापर होतो त्यावर एक घटना समोर आली आहे. शासकीय कामाच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी बनवण्यात आलेल्या महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर महिला व बालविकास अधिकाऱ्याने स्वतःचा नग्न फोटो पोस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला आहे. या प्रकारामुळे अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


बीड आयसीडीएस अर्बन' या नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. यात सर्वाधिक महिला अंगणवाडी कर्मचारी आहेत. याच ग्रुपवर महिला व बालविकास प्रकल्प अधिकार्‍याने चक्क आंघोळ करतानाचा स्वतःचा नग्न फोटो टाकल्याचे पुढे आले आहे. यापूर्वी सुद्धा या अधिकाऱ्याने या ग्रुपवर काही वेळा प्रायव्हेट फोटो शेअर केल्याचं महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले.


बीड जिल्ह्यातील अंगणवाडीच्या सेविका तसेच सहाय्यक यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपचा वापर हा पोषण आहाराचा पुरवठा तसेच शसकीय निर्णय कळवण्यासाठी केला जात होता. पण या ग्रुप वर या अधिकाऱ्याने आंघोळ करतानाचे फोटो टाकल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. हा फोटो त्या ग्रुपवर पडल्यानंतर बहुतांशी महिलांनी तो ग्रुप सोडला आहे.


ही बाब समोर आल्यानंतर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित केलं असून या अधिकाऱ्याला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.


दरम्यानस माझा मोबाईल हॅक करून कुणीतरी आंघोळ करतानाचा फोटो ग्रुपवर टाकून बदनामी केल्याच्या बनाव त्या संबंधित अधिकार्‍यानं केला आहे. याप्रकरणी सदरील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली असली तरी त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी महिला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे. हा अधिकारी इतरवेळी सुद्धा महिलांना त्रास देत असल्याच्या तक्रारी यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.