पब्जी गेम खेळत असतानाच हार्ट अटॅक

नांदेड.... डी.के.उजळंबकर 


सध्या सर्वत्र मोबाईल वर पबजी हे गेम खेळणे चालू असून याच 


पब्जी गेम खेळत असतानाच एकाला हार्ट अटॅक आल्याची घटना नांदेड ज़िल्हा येथे घडली आहे. 


मोबाइलवर पब्जी गेम खेळत असतानाच हार्ट अटॅक आल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नांदेडमधील 18 वर्षीय युवकाने उपचारापूर्वीच अखेरचा श्‍वास घेतला.


हा प्रकार नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्‍यातील मच्छिंद्र पार्डी गावात घडला आहे. 18 वर्षीय राजेश नंदू राठोड हा तरुण आपल्या मोबाइलवर पब्जी गेम खेळत होता. गेम सुरू असतानाच राजेशला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. राजेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; परंतु डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. हार्ट अटॅक आल्याने त्याची प्राणज्योत मालवल्याची माहिती आहे.


राजेशच्या अकस्माक मृत्यूने राठोड कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.


तरुण मुलाच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने माहूर तालुक्‍यात हळहळ व्यक्त केली जात आहे.