नांदेडमध्ये काँग्रेसच्या चौथ्या आमदाराला कोरोना

नांदेड : नांदेडमध्ये आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार माधवराव जवळगावकर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर नांदेडमधून विधान परिषदेवरील काँग्रेस आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यावरही उपचार सुरु आहेत.


जवळगावकर यांच्यावर नांदेडमधील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेले जाणार आहे. माधवराव जवळगावकर हे नांदेड काँग्रेसमधील मोठे नेते आहेत.


नांदेडमधील कोरोना पॉझिटिव्ह आलेले आमदार


 अशोक चव्हाण (भोकर, काँग्रेस ) - कोरोनामुक्त


 मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण, कॉंग्रेस ) - कोरोनामुक्त


 अमरनाथ राजूरकर (विधानपरिषद, कॉंग्रेस) - उपचार सुरु


माधव जवळगावकर (हदगाव, कॉंग्रेस) - उपचार सुरु


अशोक चव्हाण यांना 4 जून रोजी मुंबईतील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. कोरोनाची लागण झाल्यामुळे चव्हाण यांना 25 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अशोक चव्हाण हे लॉकडाऊनच्या काळात दोन महिने नांदेडमध्येच होते.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत