वृक्ष वाचवा , जीवन वाचवा! २३जुलै वृक्ष संवर्धन दिवस

 २३ जुलै आज वृक्ष संरक्षण दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून आपण त्याविषयी विचार करणे अत्यंत आवश्यक आहे .कारण आपणा सर्वांना ही माहिती पाहिजे की वृक्ष आहेत म्हणून निसर्ग आहे .वृक्ष आहेत म्हणून पक्षी आहेत आणि पक्षी आहेत म्हणूनच आपण ही सुंदर अशी पृथ्वी पाहत आहोत. परंतु या सुंदर पृथ्वीचे रक्षण करण्याची जबाबदारी माणसाची आहे .परंतु असं होत आहे का? हा माझा सर्वांनाच प्रश्न आहे ?फक्त प्रश्नांची उत्तरे शोधल्या मुळे प्रश्न सुटत नाही तर त्यासाठी त्या दिशेने सर्वांनी मनापासून प्रयत्न केले तरच ही गोष्ट शक्य आहे.  


   आपणा सर्वांना माहित आहे का किंवा आपण कधी विचार केला आहे का? आपल्याला एका वर्षांमध्ये ७४० किलो ऑक्सिजन लागतो आणि हा ऑक्सिजन आपल्याला निसर्गापासून विनामूल्य मिळतो. हा अक्सिजन आपल्याला फक्त आणि फक्त वृक्षच देऊ शकतात परंतु म्हणतात ना फुकटच्या गोष्टीला किंवा फुकट मिळालेल्या गोष्टीचे महत्त्व राहत नाही. आणि एक वृक्ष एका वर्षामध्ये कमीत कमी १०० किलो ऑक्सिजन तयार करतो म्हणजेच एका वर्षांमध्ये आपल्याला ऑक्सीजन मिळवण्यासाठी सात ते आठ वृक्षांची नितांत आवश्यकता आहे. परंतु याचा विचार कधीच कोणी करत नाही . याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे .कारण वृक्ष आम्हाला जीवन देतात तर त्यांना सांभाळणे हे आमचे परम कर्तव्य आहे .आणि या कर्तव्याला या निसर्गदत्त अशा मिळालेल्या उपहाराला आपण सर्वांनी सांभाळले पाहिजे" इसलिए ईस उपहार सेही अपना सुंदर संसार है " यह समजना चाहिये। सर्वांना माहीत नसेल की एक वृक्ष एका वर्षामध्ये जवळपास तीस लाख रुपयाचा ऑक्सिजन आपल्याला विनामुल्य देतो आणि इतक्या अमूल्य अशा वृक्षांची मात्र आपण कसलाही विचार न करता त्यांची कत्तल करतो. माझा सर्वांना प्रश्न आहे की हे योग्य आहे का?तर निश्चितच नाही. यासाठी सर्वांनी विचारपूर्वक विचार केला पाहिजे की कदाचित हा विचार नाही केला तर पुन्हा सुधारण्याची संधी पुन्हा पर्यावरण आपल्याला देईल का ?तुम्हाला माहीतच असेल की आपण आपल्या बाळाची जशी काळजी घेतो.तसेच त्याच्या प्रत्येक गोष्टीला महत्व देतो परंतू या वृक्षांची काळजीसुद्धा त्या बाळा सारखीच आपण घेतली पाहिजे. आपण ठरवलं तर हे शक्य नाही का? निश्चित पणे हे शक्य आहे, कारण आपणच म्हणतो की "कोशिश करने वालों की कभी हार नही होती!"


  


 परंतु नुसतं म्हणून कांहीही उपयोग नाही त्यावर विचार केला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि अंमलात आणले पाहिजे तुम्हाला माहीत नसेल की जगामध्ये दरवर्षी ५२१ करोड झाडे लावली जातात परंतु दुर्दैव अस की त्यातील पंधराशे करोड झाड तोडली जातात मग सांगा हे प्रमाण योग्य आहे का ? माझं म्हणने असे आहे की, जगातील प्रत्येक माणसाने कमीत कमी दोन झाडे लावली तर संपूर्ण जगाचे पर्यावरण हे सुजलाम-सुफलाम बनून जाईल .आज आम्ही सर्वांनी एक संकल्प केला पाहिजे की, आपल्या नावाने प्रत्येकाने एक झाड लावलेच पाहिजे आणि येणारे आपले भविष्य हे हे सुंदर बनवली पाहिजे " क्योंकी हमारी सांसे हो रही है कम ,तो लगाना होगा एक पेड कम से कम !"         


 


    आपण सर्वांनी कधी विचार केला नसेल की माणसाचं मृत शरीर रस्त्याच्याकडेला पडले असेल तर त्या वेळेला माणूस विचार करतो कि हे कसे? कशामुळे आणि कोणी केले? परंतु झाडांच्या बाबतीमध्ये मात्र रस्त्याच्या कडेला झाडे तोडून टाकलेली असतात आणि आपण तिथून जात असताना असा विचार कधीच मनात येत नाही की त्यांना पण जीव असेल आपल्याला त्या वेळेला आठवण सुद्धा येत नाही ती त्याच वृक्षांनी आपल्याला सुंदर सावली दिली आहे सुंदर अशी फुले दिलेली आहेत, आणि विशेष म्हणजे सुंदर अशी घरटी तयार करून राहण्यासाठी पक्षांना निवारा दिला आहे. यावरूनच हा माणूस किती कपटी होत चाललेला आहे. परंतु तुम्हाला या गोष्टीचा अंदाज येणार नाही जर आपण आत्ताच याचा विचार केला नाही तर मात्र तुम्हाला दुष्काळ ,त्सुनामी आणि प्रचंड जलप्रलयाला सामोरं जावं लागेल आणि त्या संकटामध्ये फक्त आणि फक्त आपणच सापडणार आहोत .विचार करा या वृक्ष संवर्धन दिवसाच्या निमित्ताने माझी माझ्या सर्व मित्रांना एकच विनंती आहे फक्त संकल्प करून उपयोग नाही त्यासाठी आज आपण वचन घेऊ की पर्यावरणाचे संरक्षण सर्वजण मिळून करू आणि आणि मी आणि आपण सर्वजण मिळून एक वचन घेऊ की सर्वांनी एक तरी झाड वाचवलं पाहिजे आणि शेवटी या वृक्षांसाठी आपण काय करू शकतो याचा विचार करण्यासाठी आणि तेच विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण ह्या गोष्टी करू शकतो. त्या कोणत्या तर त्यासाठी वृक्षगणना अभियान ,आपण चालवू शकतो, त्यानंतर वृक्ष तोडणे आणि त्यांना विकणे आपण बंद करू शकतो, राहिलेल्या वृक्षांचे संरक्षण आपण करू शकतो, आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा पाहायला मिळेल त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करू शकतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे "एक पेड एक मनुष्य" हे लक्ष्य आपण सर्वांनी ईमानदारीने पूर्ण केले तर निश्चितच वृक्षसंवर्धन होईल. तसेच वृक्षारोपण आणि वृक्ष रक्षण या कामासाठी समाजातील बेरोजगार युवक आणि युवती आहेत त्यांनाही या माध्यमातून रोजगार मिळू शकतो .असा माझा विचार आहे आणि त्याच विचाराप्रमाणे आपणही विचार करावा अशी माझी विनंती आहे. 


 


       मी आपणा सर्वांना मनापासून हे सांगू इच्छितो की आपण वृक्ष लावत आहोत ती वृक्ष नसून ती भविष्याची नांदी आहे किंवा भविष्य आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की सारे विश्व केवळ टिकून आहे ते आशेवरच ! आशा ही वेडी आहे तरीही ती बाळगण्यात प्रत्येकाला आवड आहे. " आखिर मे मै सिर्फ यह कहना चाहता हु ,की "यह पौधा नही, यह हमारी जिंदगी है !


 


 


 श्री पटवारी रामेश्वर महादेव . सहशिक्षक ,सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर.