कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..

 उदगीर  /एल.पी.उगीले


 


 


 देशासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या वीर सुपुत्रा प्रती प्रचंड आत्मीयतता बाळगणारे युवा नेता नवनाथ गायकवाड  यांनी आपल्या  शहीद कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी धाराशिवकर या सैनिक वर्गमित्राला कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या घटनेला आज 21 वर्ष पूर्ण झाली. त्यांच्या स्मरणार्थ नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे  21 गरजू गोर गरीब होतकरू लोकांना अन्न धान्य किट वाटपाचे आणि मास्कचे वाटप करून त्यांना श्रद्धांजली अर्पण  केली.. शहीद कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी आणि नवनाथ गायकवाड हे दोघेही वर्गमित्र.., दोघांचेही शिक्षण सातारा येथील सैनिक स्कुल मध्ये पूर्ण झाले.. नंतर कृष्णकांत कुलकर्णी हे देशसेेवेसाठी लष्करात भरती झाले, लष्करात भरती झाले.  वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी त्यांना कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झाली. तेंव्हापासून आपल्या तडफदार  कर्तव्यदक्ष तरुण वर्गमित्राला युद्धात आलेली वीरगती पाहून संवेदनशील मनाच्या नवनाथ गायकवाड यांच्या मनामध्ये देशसेवेची आणि सामाजिक सेवेची प्रखर ज्योत जागविली गेली. त्यामुळेच की काय ते सदैव सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी असतात.. शहीद कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी धाराशिवकर या आपल्या वर्गमित्राचे देशाचे बलिदान आपल्या पुढील पिढीसाठी स्मरणात असावे आणि त्यापासून त्यांना देशसेवेची प्रेरणा मिळावी. या हेतुने नवनाथ गायकवाड यांनी मित्राच्या  देशबलिदानाला 21 वर्ष पूर्ण झाल्यामुळे कोरोना महामारीमध्ये हतबल झालेल्या., उपेक्षित झालेल्या गोरगरीब लोकांना नायब तहसीलदार राजाभाऊ खरात,पोलीस उपनिरिक्षक गजानन पाटील, नायब तहसीलदार संतोष कुलकर्णी धाराशिवकर, नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळाचे संस्थापक  नवनाथ गायकवाड, भाजपा अल्पसंख्यांक महिला प्रमुख लातूर शेख शनु , भाजपा महिला आघाडीच्या उदगीर शहराध्यक्षा  मधुमती कलशेट्टी, यांच्या हस्ते अन्नधान्य किट आणि मास्कचे वाटप केले. वीर जवानाला या उदगीरच्या सुपुत्राला श्रद्धांजली अर्पण केली.कोरोना महामारी मुळे हतबल झालेल्या होतकरू गोर गरीब लोकांना अन्न धान्य किट वाटपाचा मदतीचा आपला महायज्ञ  सोहळा  वेग वेगळ्या उपक्रमातून चालूच ठेवला आहे.


 


          यावेळी दत्तात्रय काळजी गुरुजी,  सुनील कांबळे, अंजन गोड, शशिकुमार बीचकुंदे, विष्णुदास मुस्कावाड, उषा माने, अनिता बिरादार, शशिकला पाटील, वर्षा धावारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


 


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ सूर्यवंशी, मनीष मुळे, संतोष पांढरे, गौरव माने, कांताताई सूर्यवंशी, दीपा कोंगे, महादेवी पाटील, अरुणा  बेळकोने, बनसोडे मॅडम यांनी परिश्रम घेतले.