महसूल प्रशासनातर्फे ढोलउमरी येथे वृक्षारोपण

नांदेड.. 


शासनाने प्रशासनातील प्रत्येक विभागास वृक्षारोपण व संगोपण करण्याचे आदेश दिला असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नांदेड डॉ. विपीन इटनकर यांच्या आवाहनास प्रतिसाद देवून धर्माबाद महसूल उपविभागात धर्माबादचे उपविभागिय अधिकारी राजेंद्र शेळके, उमरी तहसिलदार माधव बोधिकर, नायब तहसिलदार रोजेश लांडगे व शंकर नरावाड यांच्या मार्गदर्शनाखाली उमरी तालुक्यातील सिवनगांव सज्जाचे तलाठी ए. आर. गोपीनवार यांनी व ग्रामपंचायत ढोलउमरीने पुढाकार घेवून गावकऱ्यांच्या सहकार्याने ढोलउमरी गावातील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने आज वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणास जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार सुनिल माचेवाड यांची उपस्थिती होती.