*दगडाने ठेचून केला खुन पो .नि .नरसिंग आकुसकर यांनी गुणवत्तेचा कस लावुन आरोपीस केले जेरबंद*

*मुखेड तालुक्यातील सांगवी बेनक येथील घटना*


 


मुखेड / प्रतिनिधी 


          मुखेड तालुक्यातील सांगवी बेनक येथील युवकास शुल्लक कारणावरुन आरोपीने दगडाने ठेचून खुन केल्याची घटना दि. ०४ ऑगस्ट रोजी रात्री ७.३० च्या सुमारास घडली. 


 


          याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत बालाजी गंगावणे हा जांब बु. येथे खरेदीसाठी ओळख असलेल्या मित्राच्या मोटार सायकलवर होंडाळा येथे दि. ०४ रोजी गेला असता रात्री ७.१५  च्या सुमारास होंडाळा येथून सांगवी बेनक येथे पायी जात असताना सांगवी बेनक - होंडाळा शिवारात आरोपी अविनाश रावसाहेब शिंदे रा. होंडाळा वय 24 वर्ष हल्ली मु. गाडगेबाबा नगर मुखेड व त्याच्या इतर साथीदार त्यांच्या वस्तीकडून होंडाळा येथे रात्री साडेसातच्या सुमारास जात असताना मयत बालाजी गंगावणे व अविनाश शिंदे व त्याचे साथीदारात भेट होऊन शुल्लक बाचाबाची झाली . 


   बाचाबाचीत  आरोपीने मयताच्या जवळील मोबाईल,नगदी काही रक्कम काढून घेऊन त्यास दगडाने ठेचून निर्घूण हत्या केली व पुरावा नष्ठ करण्यासाठी मयताचे शव नदीतील गवतात टाकले. दि ०५ ऑगस्ट रोजी होंडाळा येथील गुराख्याने सांयकाळी ४ वाजताच्या सुमारास पाहुन गावातील नागरीकांना या घटनेची माहिती सांगितली गावकय्रांनी पोलिसांना कळविली. 


 


            पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सरवदे, पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर, सहाय्यक पोनि भाऊसाहेब मगरे, पोउनि गजानन काळे,पोलिस जमामदार देविदास गित्ते,बालाजी दंत्तापल्ले, पांडुरंग पाळेकर, रमेश जोगपेठे,सिध्दार्थ वाघमारे,बळीराम सुर्यवंशी, व्यंकट जाधव, उविपो अधिकारी यांच्या पथकातील खयुम शेख , दत्ताहरी कदम ,  शंकर नागरगोजे,राजकिरण सोनकांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सरवदे, पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांनी आपल्या गुणवत्तेचा कस लावुन जांब बु येथे मुक्कामी थांबुन तात्काळ आरोपी अविनाश शिंदे यास दि. ०६ ऑगस्ट रोजी सकाळी ताब्यात घेतले असता ओरोपीने खुन केल्याची कबुली दिली.


   मयताचे भाऊ फिर्यादी दिक्षापती निवृत्ती गंगावणे वय ३१ रा. सांगवी बेनक याच्या फिर्यादीवरुन मुखेड पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलिस अधिक्षक दत्तराम राठोड, पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर हे तपास करीत आहेत.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत