डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आमची प्रार्थना - पालकमंत्री अशोक चव्हाण

.


नांदेड..... राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी अध्यातमाबरोबर सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान हे अत्यंत मोलाचे आहे. स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर काळ अनुभवत समाजाला विवेक देण्याचे खऱ्या अर्थानी त्यांनी कार्य केले आहे. त्यांची प्रकृती ही अत्यंत काळजी करण्याची असून या वयात ते कोरोनाशी लढा देत आहेत. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आम्ही ईश्वराजवळ प्रार्थना करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी आज हॉस्पिटलला भेट देऊन डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार श्यामसुंदर शिंदे, लिंगायत समाजाचे प्रमुख पदाधिकारी, प्रा. मनोहर धोंडे, किशोर स्वामी, संतोष पांडागळे, बालाजी बंडे, बालाजी पांडागळे आदी उपस्थित होते.   


 


विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी लाखो भक्तांवर प्रेम केले आहे. चव्हाण कुटुंबियांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांचे स्नेह आम्हाला लाभल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 


 


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत