महात्मा बसवेश्वरांचा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

नांदेड....... जगतज्योती महात्मा बसवेश्वर हे समतेचे पुजारी होते. अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक एकात्मतेचा विचार त्यांनी समाजापुढे ठेवला. त्यांचा समतेचा विचार पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध असून आज त्यांच्या पुतळ्याचे भूमीपुजन करताना मला मनस्वी समाधान असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. नवीन कौठा भागातील आय.जी. ऑफिसच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या भूमीपुजन सोहळा प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार अमरनाथ राजुरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर दिक्षाताई धबाले, माजी आमदार इश्वरराव भोसीकर, शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहरराव धोंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, आयुक्त सुनिल लहाने आदी उपस्थित होते.  


लवकरच तयार होणाऱ्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा भिमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी केदारजगतगुरू, राष्ट्रसंत डॉ. शिवलींग शिवाचार्य महाराज व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्याचा आपला मानस असल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले. या कामासाठी विविध सामाजिक संघटनांनी पाठपुरावा केला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले. राज्यामध्ये महाआघाडी सरकार जनतेसाठी काम करत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाकडे शासनाने निधी वळवला आहे. नांदेड येथे 200 खाटांचे सुसज्ज रुग्णालय कोरोनाच्या काळात उभे करण्यात आम्ही यशस्वी होऊ शकलो. जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे. नांदेडचे रूग्ण इतरत्र का जातात याचा शोध घेतला असून वैद्यकीय महाविद्यालयातील इमारतीतील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असून यासाठी शासन बाह्य संस्थांना स्वच्छतेचे काम देण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगीतले. नवीन कौठा परिसरात न्यायालयाची 250 कोटी रूपयांची भव्य वास्तू लवकरच उभारणार असून याच भागात सर्व कार्यालयांना एकत्रीत आणण्यासाठी प्रशासकीय इमारती उभ्या करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला.


यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे यांनी समयोचित भाषण केले. मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी पुतळा निर्मितीची प्रशासकीय बाजू आपल्या भाषणातून सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार संतोष पांडागळे यांनी मानले. 



Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत