अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा.* *शेतकरी पुत्रांचे तहसीलदारांना निवेदन.

.


मुखेड:.... -मुखेड तालुक्यात गेली 9 ते 10 दिवसापासून संततधार पावसामुळे मुग,उडीद व अन्य खरीप हंगामातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पाहणी करून विमा कंपनी व कृषी विभागाला पुढील आदेश देण्याची मागणी शेतकरी पुत्र श्रीकांत जाधव,संदीप कांबळे, योगेश जाधव यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.


                यावर्षी आवश्यक तेव्हा आवश्यक तेवढे पाऊस पडल्यामुळे खरीपांची पिके अगदी जोमात आली होती.परंतु मागील 9 ते 10 दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या या आनंदावर विर्जन घातले आहे. हाताला आलेले मुगाचे पीक आडवे पडले असून मुगाच्या शेंगांना कोंब फुटले आहे. तर उडीद,सोयाबीन,कापूस व तूर ही पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. म्हणून माननीय तहसीलदारांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पीकविमा कंपनी प्रतिनिधी व कृषी विभागाला तात्काळ आदेश देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी पुत्रांनी निवेदनाद्वारे केली आहे.


            यावेळी शेतकरीपुत्र श्रीकांत जाधव,संदीप कांबळे, योगेश जाधव सह अन्य शेतकरी पुत्र उपस्थित होते.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत