अभिवक्ता संघातर्फे रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाच्या झाडांची लागवड

.


लोहा(प्रतिनिधी):- येथील राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून प्रशासन मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे "रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे निद्रिस्त प्रशासनास जागे करण्यासाठी समाजातील बुद्धिवंत समजल्या जाणाऱ्या वकील वर्गाने हातातील लेखणी सोडून रस्त्यावर उतरून रस्त्यावरील खड्ड्यात "बेशरमाची" झाडे लावून प्रशासनाचा तिव्र निषेध केला.यावेळी भाजी मंडई समोरील महामार्गावरील खड्ड्यांत,चव्हाण कॉम्प्लेक्स समोरील महामार्ग रस्त्यावरील खड्ड्यांत तसेच शिवाजी चौकातील महामार्ग रस्त्यांवरील खड्ड्यांत बेशरमांची झाडे लावण्यात आली.


          या अभिनव आंदोलनात अभिवक्ता संघ लोहाचे अध्यक्ष ऍड.विलास चव्हाण, सहसचिव ऍड. पंडित शेटे, कोषाध्यक्ष ऍड. विश्वनाथ मच्छेवार,ऍड. डी. पी. बाबर, ऍड. एस. बी. कांबळे, ऍड. जे. वाय. पठाण, ऍड. एस. जी. जाधव, ऍड. ए. एन. मोटरवार, ऍड. बी. एम. गोरे, ऍड. सौ. जे. एस. क्षीरसागर, ऍड. सौ. के.बी. पौळ,ऍड. व्ही. एन. घोडके,ऍड. एस. एस. क्षिरसागर, ऍड. सुरेंद्र नाईकवाडे, ऍड. जी. पी. गवाले, ऍड. प्रदीप पाटील, ऍड. विठ्ठल कदम आदी सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच रस्त्यातील खड्डे तात्काळ न बुजवल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


       वारंवार होणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे खड्डा चुकवतांना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले तरीही संबंधित विभाग महामार्गावरील रस्ते दुरुस्तीकडे लक्ष देत नाही,तसेच सामान्य जनतेने केलेल्या मागणिकडेही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे वकील वर्गास रस्त्यावर उतरुन हे अभिनव आंदोलन करण्याची वेळ आली, यावरून ह्या विषयाचे गांभीर्य लक्षात येते.लोहा हे मोठे शहर असूनही केवळ खड्डेमय रस्त्यामुळे येथे बदलीवर अधिकारी येण्यास तयार होत नसल्याचे दिसून येते.


लोकांना कायद्याच्या आणि लेखणीच्या जोरावर न्याय मिळवून देणाऱ्या वकिलांच्या या अभिनव आंदोलनामुळे झोपेचं सोंग घेतलेल्या संबंधित विभागाचे धाबे दणाणून गेल्याची चर्चा विविध संपर्क माध्यमाद्वारे जनतेत चवीने चर्चिली जात आहे.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत