...अन् जिल्हाधिकाऱ्यांनी गाठली स्मशानभूमी!

उदगीर/प्रतिनिधी


 


लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी काल रात्री अचानक उदगीर येथील कोविड रुग्णालयास भेट दिली. आज दि. 3 ऑगस्ट रोजी शहरातील विविध भागांची पाहणी करीत असतांना आचानक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दगावल्याची माहिती मिळताच ते थेट स्मशानभूमीत दाखल झाले व पालिका प्रशासन करीत असलेल्या कामाचे कौतुक केले.


    कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना करणे हे प्रशासनाचे काम आहे. पण काम करणाऱ्यांच्या पाठीवर कर्तृत्वाची थाप मिळाली की काम करण्यास आधिक हुरूप येतो. अशीच अनुभूती उदगीरचे मुख्याधिकारी भरत राठोड व त्यांच्याकर्मचाऱ्यांना आली आहे. गेली चार महिने उदगीर मध्ये कोरोनाच्या साथीमुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाला या सर्वांवर मुख्याधिकारी भरत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पालीका कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाय कोरोनाच्या व लॉकडाउनमुळे अंत्यसंस्कार होवू न शकलेल्या मृतदेहावर आपले कर्तव्य म्हणून त्यांच्यावरही अंत्यसंस्कार केले. भरत राठोड व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचे काम उल्लेखनीय असल्याचे उदगीरकरांनी अनुभवल आहे.


आज त्यांच्या कामाची दखल चक्क जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. उदगीर येथील एका कोविड रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुख्याधिकारी व त्यांची टीम आपली जबाबदारी पारपाडीत अंत्यसंस्काराची तयारी करीत होते. जिल्हाधिकारी शहरातील विविध भागात जावु पाहाणी करीत असतांना त्यांना निरोप आला उदगीर कोविड रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला असून त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे. ते लगेच आपला मोर्चा स्मशानभूमीकडे वळविला आणि अंत्यसंस्कारास उपस्थित राहुन सर्व पाहाणी करीत कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. केलेल्या कामाचे कौतुक झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले.