माझी तब्यत उत्तम आहे तुम्ही सर्व काळजी घ्या - जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर

.


नांदेड...... "कोविड-19 ची लक्षणे मला दिनांक 30 ऑगस्ट रोजी लक्षात आल्याबरोबर मी रितसर विनाविलंब तपासणी करुन घेतली. यापूर्वी आमच्या कार्यालयातील काही लोकांना कोविड-19 ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे मी अधिक खबरदारी घेणे उचित समजून स्वत:हून आगोदर होम क्वारंटाइन झालो. काल सोमवार 31 ऑगस्ट 2020 माझा आहवाल बाधित आल्याने आपल्या नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार सुरु केले आहेत. माझी प्रकृती स्थिर असून तुम्हा सर्वांच्या सदिच्छांच्या बळावर लवकरच यावर यशस्वी मात करून पुन्हा जोमाने काम सुरू करू" असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी व्यक्त केला आहे. कोविड-19 हा संसर्गजन्य असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी वारंवार हात धुणे, मास्क वापरणे व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे अधिक महत्वाचे आहे. आपण सर्वजण योग्य ती काळजी घेऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड हॉस्पिटल कक्षातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत.


 


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत