*प्रा.सिध्देश्वर गुंडप्पा पटणे सरांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान*

.


उदगीर...... 


 *उदगीर येथील सुप्रसिद्ध अशा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक तथा खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा.सिध्देश्वर गुंडप्पा पटणे यांचा उपजिल्हा अधिकारी मा.प्रवीणजी मेंगशेटे यांच्या हस्ते व तहसीलदार मा.व्यंकटेशजी मुंढे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.दिपककुमार वाघमारे, डॉ.दत्तात्रय पवार, मातृभूमी महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश उस्तुरे, प्रा.बिभीषण मद्देवाड, ज्येष्ठ पत्रकार मा.सुनील हवा, मा.श्रीनिवास सोनी, मा.सिद्धार्थ सूर्यवंशी, मा.रामेश्वर पटवारी सर इत्यादींच्या उपस्थितीत, प्रा.सिध्देश्वर पटने यांनी कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीसाठी त्यांच्या संघटनेतर्फे 1लाख रुपयाचा निधी जमवून दिला, शहर पोलीस स्टेशन उदगीर येथे सॅनेटायझर व मास्क चे वाटप केले, तसेच गोरगरिबांना 200अन्नधान्य किटचे वाटप केले आहेत इत्यादी केलेल्या सर्व कार्याची दखल घेऊन रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानाबाबद्दल त्यांचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व्यापारी अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.*.