ईटग्याळ येथे विज पडून दोन बैलाचा मृत्यू

.


मुखेड (प्रतिनिधी) मौजे ईटग्याळ तालुका मुखेड येथे वीज पडून नुकताच दोन बैलाचा मृत्यू झालेला आहे मुखेड मौजे ईटग्याळ येथील शेतकरी नामे उमाकांत वाघोजी कोठारे यांच्या घरावर रात्रीच्या वेळी वीज पडून दोन बैलाचा मृत्यू झालेला आहे. या दोन जोडी बैलाची किंमत एक लाख पाच हजार रुपये एवढी आहे. त्यातच कबळबाई पांडुरंग कोठारे राहणार ईटग्याळ तालुका मुखेड पोस्ट मुक्रमाबाद याचे घर पण रात्रीच्या पावसाने व विजेच्या धक्क्याने रात्रीच्या वेळी ढासळून पडलेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले असून घरावर आर्थिक संकट पडलेले आहे. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तरी या शेतकऱ्यांची बैलजोडीची व संबंधित घराची पहाणी व पंचनामा करून संबंधित तहसीलदार मार्फत नुकसान भरपाई मिळावी, अशी सर्व स्तरातून गावातील नागरिकांची मागणी आहे. लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी म्हणून संबंधित तहसीलदार कडे ज्या शेतकऱ्याची व बाईच्या घराची नुकसान झालेली आहे, याकडे गावातील गावकरी मंडळी वाट पहात आहेत.