क्षयरोग व कुष्टरोग मोहिमेस 1 डिसेंबरपासून सुरूवात सहकार्य करण्याचे आरोग्य यंत्रणेचे आवाहन

लातूर......  शासनाने दिलेल्या निर्देंशानुसार जिल्हाधिकारी जी श्रीकांत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 1 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत या मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये 1 हजार 853 आरोग्य टिमद्वारे 19 लाख 7 हजार 342 लोकसंख्येचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात येणार आहे. ही मोहिम क्षयरोग व कुष्ठरोग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषेदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी व सहायक संचालक कुष्ठरोग यांनी एका पत्रकान्वये लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 


या मोहिमेत आरोग्य विभागाच्या माध्यमातून दि. 1 ते 16 डिसेंबर, 2020 या कालावधीत जिल्ह्यात क्षयरोग कुष्ठरोग शोधण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील शंभर टक्के तर शहरी भागातील 30 टक्के नागरिकांचा यात घरोघर जाऊन सर्वे करण्यात येणार आहे. यामध्ये एक महिला व एक पुरुष स्वयंसेवकाच्या माध्यमातून शारीरिक तपासणी केली जाईल, लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा तपासणी केली जाईल. व त्यावर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत.


या मोहिमेत आरोग्य विभागाच्या वतीने दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, ताप असणे, वजनात घट होणे थूकवाटे रक्त जाणे, मानेवर गाठ असणे. अशी लक्षणे आढळून आल्यास संशयित म्हणून नोंद घेऊन पुढे त्यांच्या सर्व तपासणी व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहे. रोगाची लक्षणे अंगावर चट्टे हाता पायाला मुंग्या येणे, स्नायुमध्ये अशक्तपणा येणे, बधिरता येणे, भुवयाचे केस विरळ होणे, चेहरा तेलकट होणे, तळहात तळपायाला बधीरता जाणवणे अशी लक्षणे असणार यांनी पुन्हा एकदा तपासणी करून त्यांच्या मोफत व तयार केले जाणार असल्याने संशयित रुग्णांनी प्रशासनास सहकार्य करण्याचेही आवाहन केले आहे.  


या मोहिमेचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख, जिल्हा क्षय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, सहसंचालक कुष्ठरोग हेमंत कुमार बोरसे, डॉ.राहुल आनेराव, डॉ. अल्का परगे व समस्त कर्मचारी व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ते तालुका स्तरावर या संयुक्त अभियानाचे नियोजन केले असल्याचे कळविले आहे. .