उदगीर ची तरुणाई पडली पर्यावरणाच्या प्रेमात..

.


उदगीर....... उदगीर येथील पेडल टू गो या पर्यावरण प्रेमी संघटनेने उदगीर च्या तरुणांना पर्यावरण पूरक जीवन जगण्यासाठी प्रेरित करत एक नवीन चळवळ सुरू केली.दोन वर्षाच्या या प्रवासात त्यांनी असंख्य तरुणांना झोपेतून उठवून त्यांच्या हातात सायकल देवून एक नव्या प्रवासाला सुरुवात केली.सर्व प्रकारच्या वयोगटातील तरुण,सर्व क्षेत्रातील आपला पेशा, वय विसरून सायकल चळवळ उदगीर मध्ये कशी रुजेल आणि आपले आणि उदगीरचे आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न सुरू केला.यापुढे जाऊन पर्यावरणपूरक कार्यक्रम साजरे करणे व नव्या पिढीला सोशल मीडियाच्या वाढदिवस संस्कृतीपासून पर्यावरण संस्कृती कडे वळवण्याचे काम सुरू केले.


याचेच फलित युवराज कांडगिरे यांनी आपल्या वाढदिवशी नवीन सायकल घेऊन पेडल टू गो हा परिवार जॉईन केला.त्यांचे स्वागत करताना पेडल टू गो ग्रूपने त्यांच्या हस्ते एक वृक्ष लाऊन त्यानं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पेडल टू गो ग्रुप च्या वतीने चंदन पाटील नागराळकर यांनी युवराज कांडगिरे यांचे स्वागत केले.या प्रसंगी ओमकार गांजुरे,राहुल वट्टमवार,डॉ.नरेंद्र जाधव,अमोल घुमाडे,डॉ संतोष मानकरी, विकास देशमाने,नंदू पटने,संदीप मद्दे,कृष्णा कुंभार,सुनील ममदापूरे,पोले नारायण,लिंगेश पाटील व इतर सदस्य उपस्थित होते