सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत

लातूर..... महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम -10 नुसार या कायद्यान्वये देण्यात आलेली सावकारी व्यवसायाची अनुज्ञप्ती, ज्या दिनांकास अनुज्ञप्ती देण्यात येईल त्या दिनांकापासून त्यानंतर येणाऱ्या 31 मार्च पर्यंत वैध राहिल अशी तरतूद आहे.सावकारी परवाना नुतनीकरणाचा अर्ज अनुज्ञप्तीची मुदत संपण्याच्या आधी 3 महिन्याच्या आत कोणत्याही दिनांकास करता येईल. सहाय्यक निबंधक, अनुज्ञप्तीच्या नुतनीकरणाचा अर्ज सदर अनुज्ञप्तीची मुदत संपल्यानंतर साठ दिवसानंतर स्वीकारणार नाही, अशी तरतुद आहे.


महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम-10 नुसार प्रत्येक सावकारी परवाना धारकाने त्याच्या परवान्याचे विहित मुदतीत नुतनीकरण करुन घेणे आवश्यक असून त्याशिवाय सदर सावकारी परवाना वैध गृहित धरला जात नाही. सावकारी परवान्याचे विहित मुदतीत नुतनीकरण करुन घेणे बंधनकारक आहे. तथापि, लातूर जिल्हयातील बऱ्याच परवानाधारक सावकारांने त्यांचे सावकारी परवान्याचे नुतनीकरण करुन घेतलेले नाही.


महाराष्ट्र शासनाने दिनांक 6 नोव्हेंबर 2020 रोजीच्या राजपत्रान्वये सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत संबंधित सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी स्विकारण्यात यावे अशी दुरुस्ती केली आहे. त्यानुषंगाने लातूर जिल्हयातील ज्या परवानाधारक सावकारांचे सावकारी परवान्याचे नुतणीकरण करणे प्रलंबित आहे अशा परवानाधाकर सावकारांनी दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहाकारी संस्था यांचेकडे प्रस्ताव दाखल करण्यात यावेत असे सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था समृत जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.