*इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार संपन्न*

.


उदगीर.... उदगीर येथील सुप्रसिद्ध अशा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने तथा खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा.सिध्देश्वर पटणे यांच्या वतीने राज्य पीटीएचे उपाध्यक्ष प्रा.गोपाळकृष्ण घोडके सर , महाराष्ट्र बसव परिषदेचे जिल्हा अध्यक्ष कुणाल बागबंदे साहेब, डॉ.धनंजय पाटील सर , युवक काँग्रेसचे सरचिटणीस ईश्वर संगमे सावकार, डॉ.रवी मुळे साहेब, सुप्रसिद्ध उद्योगपती सोमशेखर चिल्लरगे सावकार, सोनू हाश्मी यांच्या उपस्थितीत नागपूरचा राज्यस्तरीय डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.पांडुरंग फड सर यांचा तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा.दिपक आंब्रे साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या उदगीर शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा.अजय शेटकार साहेब तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदगीर शहर कार्यध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा.आजम पटेल साहेब, मा.सोनू हाश्मी या सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व गुलदस्ता देऊन यथोचीत सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्व सत्कारमूर्तींनी सत्कारास उत्तर दिले तर मा.कुणाल बागबंदे आणि प्रा गोपाळकृष्ण घोडके यांची अप्रतिम भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी प्रा. सोमनाथ बिराजदार, प्रा.चंद्रकांत शिवपुजे, प्रा.संतोष चौधरी, प्रा.पांडुरंग काजबा, प्रा. नागनाथ शाहू, प्रा.राजकुमार हळीकर, प्रा.मल्लिकार्जुन होळसांबारे, चंद्रकांत काटवाटे, विकास दुपारे, ज्ञानेश्वर माने, कृष्णा खटके इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संयोजक प्रा.सिध्देश्वर पटणे यांनी केले..