ग्रामीण पोलिसाकडून हातभट्टी वर धाडी, 57 हजाराचा रसायन नष्ट

.


उदगीर (प्रतिनिधी)


 


 उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील नागलगाव बीट, राठोड तांडा, तोंडार बीट याठिकाणी अवैध पद्धतीने हातभट्टीची दारू बनवली जात असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच ग्रामीण पोलिसांनी हातभट्टीच्या विरोधामध्ये मोहीम उघडून ठिकाणी धाडी टाकल्या.  जवळपास 57 हजार रुपये किंमतीचे अवैद्य दारू बनवण्याचे रसायन पोलिसांनी जप्त करून नष्ट केले आहे. नागलगाव बिट येथिल चार धाडीत 192 लिटर गावठी हातभट्टी दारू व रसायन याचे अंदाजे किंमत 14 हजार चारशे रुपये होते. ते जप्त करून त्याची विल्हेवाट लावली आहे. तसेच राठोड तांडा व तोंडार बीट या ठिकाणी झालेल्या धाडीत गुळ मिश्रित रसायन दोनशे पन्नास लिटर व गावठी हातभट्टी सत्तर लिटर असे मिळून या पाच धाडी मध्ये 57 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.


 


 वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्यासह पोलीस नाईक नामदेव सारोळे, चंद्रकांत कलमे, मारुती शिंदे, तुळशीराम बोरुरे, राहुल गायकवाड, दयाराम सूर्यवंशी इत्यादींनी धाड यशस्वी करण्यात सहकार्य केले. उदगीर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैद्य हातभट्टीची आणि देशी दारू विक्री होत होती. या धाड सत्राने निश्चितच आळा बसेल. असा विश्वास लोकांना वाटू लागला आहे. पोलिसांच्या या कर्तबगारीचे कौतुक ग्रामीण भागातून होत आहे