ऑनलाइन परीक्षा व अभ्यासक्रम घेऊन शिक्षकांनी दाखवली दमदार कामगिरी...

.


 


खरंतर या ऑनलाइन द्वारे विद्यार्थ्यांचा 100% विकास हा नक्कीच झालेला नाही.


परंतु पूर्णपणे अभ्यासापासून वंचित राहण्यापेक्षा किमान 50 टक्के तरी या ऑनलाइन द्वारे आमच्या विद्यार्थ्यांनी ज्ञान ग्रहण केले आहे.


तसेच वर्षभरामध्ये येणारे सर्व दिनविशेष जयंत्या-पुण्यतिथ्या तसेच विशेष कार्यक्रम आषाढी दिंडी गोपाळकाला नवरात्र महोत्सव गणपती उत्सव असे अनेक कार्यक्रम हे ऑनलाईन द्वारेच सर्व सर्व वर्गातील शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून करून घेतलेला आहे.


या ऑनलाईन कार्यक्रम घेत असताना एक फायदा निश्चित झालेला आहे बाहेर गावच्या तज्ञ मंडळींना प्रमुख अतिथी व प्रमुख वक्ता म्हणून बोलताना खूप सोपं झालं.


कारण त्यांच्या घरी बसून सुद्धा ती मंडळी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सर्व कला आविष्कार पाहत होती. व या जेष्ठ मंडळींचं मोलाचे मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना मिळाले.


शाळा जरी ऑनलाइन द्वारे दोन तास किंवा तीन तास घेण्यात आली असली तरीही शिक्षकांना किमान आठ तास ही पूर्णवेळ त्यांची ड्युटी करावी लागत होती.


दोन तास ऑनलाईन क्लास शिकवणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे गृहपाठ तपासावे लागत होते आणि विद्यार्थ्याला होम वर पाठवणे गणिते पाठवणे त्यांचे गणिते तपासणी असे अनेक काम करत असताना शिक्षकांचा वेळ हा कसा जात होता हे त्यांनाच कळत नव्हते.


फुल ना फुलाची पाकळी म्हणतात ना अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना covid-19 च्या काळात शिक्षणापासून वंचित ठेवण्यापेक्षा कुठेतरी त्यांना ऑनलाइन द्वारे जोडून त्यांचा बौद्धिक विकास करण्याचं कार्य माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांनी अगदी मनापासून केलेला आहे.


सर्व विद्यार्थी शिक्षकांना दररोज ऑनलाइन द्वारे पाहू शकत होते त्यांच्याशी गप्पा मारू शकत होते त्यांच्याशी बोलू शकत होते.


बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की ऑनलाइन शिक्षण कुठे शिक्षण असतं का ....


पण मी नक्कीच म्हणेल शंभर टक्के तर शिक्षण काही होत नाही पण.. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पूर्णविराम देण्यापेक्षा विद्यार्थ्यांना या शिक्षण प्रवाहात ओढण्याचे माध्यम म्हणून आपण ऑनलाइन द्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा मानस केलेला आहे.


ऑनलाइन शिक्षण देत असताना माझ्या सर्व शिक्षकांना अनेक अडचणी आल्या अनेक प्रश्न निर्माण झाले तरीही ही माझी शिक्षक न डगमगता न घाबरता या स्पर्धेच्या युगामध्ये खंबीरपणे पाय रोवून आपल्या विद्यार्थ्याला ज्ञानदान देण्याचं कार्य हे त्यांनी केलेले आहे.


तसेच सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन द्वारे बऱ्यापैकी शिक्षण घेण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक वर्गाची शंभर टक्के उपस्थिती नक्कीच नव्हती.


कारण बऱ्याच पालकांकडे मोबाईलची कमतरता असल्यामुळे किमान पन्नास टक्के विद्यार्थी हे या शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत.


निश्चितच या विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यानंतर यांची पूर्ण तयारी करून घेण्याचे आम्ही ठरवलेला आहे.


ऑनलाईन प्रशिक्षण देत असताना आम्हाला सर्व पालकांचे खूप खूप मोलाचे सहकार्य लाभलेला आहे.


माझ्या शाळेतील सर्व वर्गशिक्षिका .नीता, गडीकर, माया होनराव, प्रतिभा विश्वनाथे, मंगल वाडकर, भाग्यश्री पाटील, प्रशांत पाटील, संदीप पाटील, वृक्षाला जाधव, सारिका शिंदे, बालाजी रोडे, मंगल पकोले, सुजाता महाजन, अर्चना सोलापुरे.


या सर्व शिक्षकांनी अतिशय मोलाची कामगिरी या काळामध्ये केलेली आहे म्हणून मला माझ्या शिक्षिका बद्दल इथं असं म्हणावसं वाटते.


" इतुकेच अंगी यावे बळ फक्त


खडूतून रक्त उतरावे


उतरावे आणि देह व्हावा मुग्ध


खडूतुन दुग्ध स्त्रवतना "


या ओळीप्रमाणे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना खडू रूपी दुधाने मुग्ध करावे हीच इच्छा ईश्वरचरणी प्रगट करते व पुढील काळामध्ये या रोगावर मात करून लवकरच शाळा सुरू व्हावे ही इच्छा बाळगतो धन्यवाद....


 


 आशा वसंतराव बेंजारगे.


मो. न.8329258770


सरदार वल्लभाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर.    


 सेमी. विभाग:- प्रमुख