*माफसूच्या पशुवैद्यक पदवी अभ्याक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु*

उदगीर..... 


महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची पशुवैद्यक पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून त्याकरीता दि. २१ ते २७ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज भरण्याचे आव्हान करण्यात येत आहे. विद्यापीठ संकेतस्थळावर (www.mafsu.ac.in) प्रवेशासाठीची माहितीपुस्तिका उपलब्ध 


असून अधिक माहितीसाठी बारावी विज्ञान शाखा व नीट परिक्षा दिलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी संकेतस्थळास अवश्य भेट द्यावी असे आवाहन उदगीर येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे मा. सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. रावजी मुगळे यांनी केले.