शिरसे यांची निवड म्हणजे त्यांच्या ग्रंथालय कार्याचा गौरव- दिनेश पाटील 

.


उदगीर (प्रतिनिधी) ग्रंथालय क्षेत्रात गेल्या 35 वर्षापासून ग्रंथालयीन कर्मचारी आणि ग्रंथालयाचे प्रश्न यासंदर्भात चळवळ उभा करून या चळवळीच्या माध्यमातून सूर्यकांत शिरसे यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्या कार्याची दखल घेऊनच लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच जिल्हा कार्यकारिणीवर संचालक म्हणून उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ मोतीपवळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात आला. या सत्कार समारोह साठी ज्येष्ठ पत्रकार तथा ग्रंथालय चळवळीचे कार्यकर्ते एल. पी. उगिले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


 


 महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीला सध्या खूप वाईट दिवस असून, गेल्या आठ-दहा वर्षात ग्रंथालयाचे अनुदान, ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे मानधन यासंदर्भात कोणतीच भरीव कामगिरी झाली नाही. त्यामुळे बी. जी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ग्रंथालय सेना सक्रियपणे कार्य करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या माध्यमातून ग्रंथालयाचे प्रश्न सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणार असल्याचेही याप्रसंगी दिनेश पाटील यांनी सांगितले.


 


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन छगन पाटील यांनी केले.