शास्त्री विद्यालय म्हणजे गुणवंतांची खाण- तहसीलदार गोरे

 .


उदगीर...... शालेय जीवनात मिळालेले संस्कार व शिक्षण हेच आयुष्याची दिशा ठरवतात.विद्यार्थ्यांनी नेहमीच सकारात्मक मनोवृत्तीतून यश खेचून आणावे कारण मनोबलच यश मिळवण्यासाठी उर्जा पुरवत असते असे मत तहसिलदार रामेश्वर गोरे यांनी लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या गुणवंताच्या सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.शास्त्री विद्यालय म्हणजे गुणवंतांची खाण आहे हे सांगताना आपणही याच संस्थेचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगत त्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.येथील लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयाच्या दहावी व इतर स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात तहसिलदार रामेश्वर गोरे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना संबोधित केले.


            यप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथीस्थानी उपस्थित असलेले भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सहकार्यवाह प्रा.चंद्रकांत मुळे यांनी शास्त्री विद्यालयातील मुले हे गुणवत्तासंपन्न असून,शैक्षणिक गुणवतेच्या बाबतीत भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ही मराठवाड्यातील अग्रेसर संस्था असल्याचे नमूद करत दहावी परीक्षेत शंभर टक्के गुण घेणारे चौदा विद्यार्थी असणं म्हणजे शाळेची मोठी झेप आहे,असे मत व्यक्त केले. यावेळी शालांत परीक्षेत १००% गुण घेणाऱ्या चौदा विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला.तसेच संस्थेच्या बीटीएस परिक्षेतील गुणवंत व नवोदयला पात्र ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.


  याप्रसंगी अध्यक्षस्थानी लाभलेले मधुकरराव वट्टमवार यांनीही १००%गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे व १००% निकाल लावणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले .या सत्कार सोहळ्यात शंकरराव लासुणे,मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी,डॉ.संजय कुलकर्णी,व्यंकटराव गुरमे,षण्मुखानंद मठपती,केंद्र प्रमुख प्रतिभा मुळे मंचावर उपस्थित होते.


          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कोरे,प्रास्ताविक रामेश्वर मलशेट्टे, निकाल वाचन कृष्णा मारावार व लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी केले. स्वागत व परिचय विजय दीक्षित यांनी केले तसेच अंकीता ढगे व वरद मारावार या विद्यार्थ्यांने प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले तर आभार लालासाहेब गुळभिले यांनी मानले.