"Covid-19 च्या काळात प्रथम सत्र परिक्षा" यशस्वीरित्या पूर्ण.....

उदगीर........ साक्षर हमे बनाते है,


जीवन क्या है समजाते आते है,


जब गिरते है हम हार कर तो सहस वही बनाते है, ऐसे महान व्यक्ती ही ही तो शिक्षक गुरु कहलाते है.....


सरदार वल्लभाई पटेल प्राथमिक विद्यालय विशेष अभ्यास कक्ष सेमी विभागामध्ये प्रथम सत्र परिक्षा नियोजनबद्ध व शिस्तबद्ध ऑनलाइन गुगल मॅप द्वारे घेण्यात आल्या. 


शिक्षक म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारी प्रेरणा


ध्येयपूर्तीसाठी मार्ग दाखवणारी दिशा


कधी बिकट परिस्थितीत प्रेमाची साथ तर कधी पाठीवरील शब्बासकीचा हात, कधी कौतुकाचे गोड शब्द तर कधी हातावर बसणारा छडीचा मार.


शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती,


संकट काळात धैर्य देणारी स्पूर्ती.


चारित्र्य पूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार.


जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची स्वप्न साकार.


"शिक्षक म्हणजे सखोल मूलभूत ज्ञानाचे भांडार.


दूर करी जीवनातील अज्ञानमय अंधार,


अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी तलवार,


अनुभवातून निर्माण होणारा साक्षात्कार असे हे शिक्षकांचे आजन्म न फिटणारे उपकार."


कोरोना काळाची पार्श्वभूमी आपणा सगळ्यांना माहितीच आहे यानुसार मी आज आपणा समोर या दरम्यान मी व माझा शिक्षक म्हणून माझी आणि माझ्या सहकार्याची व माझ्या शाळेची थोडक्यात भूमिका मांडणार आहे. तुम्हाला माहित आहेच.


आलेल्या संकटावर मात करून शिक्षक वर्ग अतिशय तळमळीने जिद्दीने व प्रामाणिक पणाने प्रथम सत्र अभ्यासक्रम पूर्ण करून.


प्रथम सत्र परीक्षा ही यशस्वीरित्या संपन्न झालेल्या आहेत.


15 जुलैपासून आजपर्यंत आमचे ऑनलाईन क्लास हे व्यवस्थित रित्या चालत आहेत.


खरंतर कोरोना काळामध्ये मुलांचं काय होणार शाळेचं काय होणार ही चिंता सतत मला व माझ्या सर्व शिक्षकांना भेडसावत होती.


असे असताना माझ्या सर्व शिक्षक वृंद यांनी पुढाकार घेऊन ऑनलाइन क्लास घेण्याची सुरुवात केली.


अगोदर सुरुवातीला सर्व वर्गाचे पालक मेळावे घेऊन पालकांच्या प्रतिक्रिया घेतल्या व पालकांच्या सहमतीने ऑनलाइन क्लासला सुरुवात केली.


सर्व वर्गाचं ऑनलाइन क्लासचे वेळेचे नियोजन करून विद्यार्थ्यांपर्यंत व्हाट्सअप द्वारे सांगण्यात आले.


त्यानुसार पाचवी सहावी सातवी सकाळी सात ते 11:40 या वेळामध्ये तिन्ही वर्गाचे क्लास पूर्ण होत होते.


साडेदहा ते एक या वेळामध्ये चौथी या वर्गाचा ऑनलाईन क्लास घेतला जात होता.


साडेबारा ते 3 या वेळामध्ये तिसरीच्या वर्गाचा ऑनलाईन क्लास घेतला जात होता.


तसेच एक ते तीन या वेळामध्ये दुसरीचा वर्ग ऑनलाईन क्लास घेतला जात होता.


सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे इयत्ता पहिली या वर्गाचा ऑनलाईन क्लास अतिशय सुंदर रित्या आमच्या विशेष अभ्यास पक्षातल्या नीता गडीकर बाईंनी खूप छान प्रकारे घेतलेला आहे.


सुरुवातीला पहिलीचा ऑनलाईन क्लास घेत असताना पालकांनाच मीटिंग आयडी तयार करणे मीटिंग मध्ये सामील होणे किंवा मीटिंग बंद करणे कॅमेरा ओपन किंवा बंद करणे या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण अगोदर पालकांना देण्यात आलं त्यानंतर पालकांनी आपापल्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टीची जाणीव करून दिली व 30 जुलै पासून पहिली या वर्गाचे ऑनलाईन क्लास सुरळीत चालत आहेत.