मयत पत्रकार सोमवंशी यांच्या कुटुंबास शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदेंकडून एक लाखाची मदत

उदगीर/प्रतिनिधी



लातूर येथील पत्रकार स्व. गंगाधर सोमवंशी यांच्या निवासस्थानी ठाण्याचे माजी महापौर, लातूर जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी भेट देऊन राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.


        कोरोना साथीच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले. खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कोविड योद्धा यांच्या कुटुंबियांना नगरविकास मंत्री ना एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. शिवाय राज्यातील अनेक गोरगरीब लोकांना लॉकडाऊन च्या काळात अन्नधान्यांचे किट देवुन त्यांची भुक भागवली. ना. शिंदे यांच्या मदतीमुळे अनेकांची संसार उभी टाकली आहेत. कोरोनाच्या संकट काळात आपला जिव धोक्यात घालून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान केला. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुबीयांना आधार देत आर्थिक मदतही करण्यात आली.


लातुर येथील पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनाही एक लाखांची मदत देण्यात आली.


 यावेळी सोबत जिल्हाप्रमुख नामदेव चाळक , संतोष सोमवंशी महिला जिल्हा संघटक सुनिताताई चाळक, शिवसेना वैधकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, मराठी परिषदेचे अनिल महाजन, जिल्हा मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष नरसिंह घोणे, राजकुमार मोगले, शशिकांत पाटील, अभय मिरजकर, अमर बुरबुरे, प्रसाद सूर्यराव व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.