जिल्हा परिषद शाळेच्या मैदानातील फटाका दुकाने बंद करा--भारतीय दलित पँथरची मागणी

उदगीर.(प्रतिनिधी)-उदगीर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानातील फटाका दुकाने विनापरवाना बेकायदेशीर चालू आहेत तरी प्रशासाने लवकरात लवकर


 बंद करण्यात यावी अशी मागणी भारतीय दलित पँथरचे लातूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब बनशेळकिकर


यांनी निवेदनाद्वारे उपजिलाधिकारी यांना केली आहे.


 नगरपरिषदेची परवानगी न घेता व अग्निशमन दलाची सुरक्षा रक्कम न भरता चालू केली आहेत. असे करून येथील व्यापारी यांनी प्रशासनाचा अवमान केला आहे.


जि.प. शाळेत येण्याजाण्या साठी एकच मार्ग आहे, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर या ठिकाणी सोशल डिस्टनस च्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी होत् नाही.यामुळे नागरिकांच्या जिवितास धोका होऊ शकतो


या सर्व बाबींचा विचार करून संबंधित दुकानदारावर कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी व फटाके दुकनाची जागा बदलण्यात यावी अन्यथा भारतीय दलित पँथर वतीने आंदोलन करण्याचा इशारा अण्णासाहेब बनशेळकीकर दिला आहे.


             ‌‌