उदयगिरी लॉन्सस नेत्र रुग्णालयाकडून दृष्टी देण्याचे महानकार्य- प्रा. डाँ. राजकुमार मस्के

.


उदगीर/प्रतिनिधी  


सध्या मानव हा विविध आजाराने त्रासाला कंटाळलेला असून, अनेक वयोवृद्ध महिला- पुरुष यांच्या डोळ्यावर पण सतत परिणाम होत आहे. त्यावर शस्त्रक्रिया करून वयोवृद्ध पुरुष, स्त्रियांना दृष्टि देण्याचे महान कार्य मराठवाडा व सीमावर्ती भागातील अनेक रुग्णांना उदयगिरी लाँयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय करत आहे. असे मत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डाँ. राजकुमार मस्के यांनी व्यक्त केले. ते उदयगिरी लाँयन्स धर्मदाय नेत्र रुग्णालय उदगीर येथे आयोजित केलेल्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.


       या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. सुनील जवळे तर उदघाटक म्हणून बालकीर्तनकार मा.ह.भ.प. ज्ञानेश्वरी दीदी सुरनर अनुपवाडीकर हे होते. तसेच रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया, लॉयन्स देबडवार, सौ. लाहोटी मॅडम आदींची उपस्थिती होती.


     यावेळी बोलतांना प्रा. डॉ. मस्के म्हणाले मानवी जीवनात डोळ्यांना खुप महत्त्व आहे. बदलत्या जीवन शैली मुळे मानवी जीवन झपाट्याने बदलत होताना दिसत असुन आपले सर्वांचे आरोग्य हे दिवसेंदिवस बदलत चाललेले आहे. त्यावर सर्वांनी मात करून, आपले आरोग्य चांगले ठेवावे. याप्रसंगी ह.भ.प. सुनील जवळे महाराज यांनी डॉ. रामप्रसाद लाखोटिया यांच्यावर काव्यरचना करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर ह.भ.प. ज्ञानेश्वरी दीदी सुरनर यांनी आपल्या अमृतवाणीतून उदयगिरी लाँयन्स धर्मदाय नेत्र रुग्णालय हे करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. व तसेच रुग्णालयातील कर्मचारी अहोरात्र कार्य करून या रुग्णालयाचे नाव एक दिवस या देशात गाजवतील असेही त्या यावेळी सांगितले. या प्रसंगी रुग्णालयाचे अध्यक्ष मा. डॉ. रामप्रसाद लाखोटिया यांनी रुग्णालय स्थापन केल्यापासून आत्तापर्यंत केलेल्या सर्व कार्याचा आढावा सांगून दि. १२ डिसेंबर २०२० रोजी खासदार शरदचंद्र पवार यांच्या नावाने नवीन होणाऱ्या खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजनाच्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तसेच या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये नेत्र शिबिराचे आयोजन केलेल्या प्रमुखांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास उदगीर शहरातील प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, शिक्षण प्रेमी नागरिक यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार या रुग्णालयाचे प्रमुखअधिकारी प्राध्यापक एस. एस. पाटील यांनी केले.