एम आय एम आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत-- निवृत्ती सोनकांबळे 

.


उदगीर/ प्रतिनिधी 


 


मराठवाडा पदवीधर मतदार संघात सध्या एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांमुळे चांगलीच रंगत आली आहे. अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय मतदारांची एक गठ्ठा मते वंचित बहुजन आघाडी च्या पारड्यात पडणार असल्याने निश्चितच आजच्या घडीला प्रमुख उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवाराकडे पाहिले जात आहे. असे विचार उदगीर नगरपालिकेचे नियोजन सभापती तथा राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले. एका बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार शिक्षकांच्या प्रश्नावर न बोलता, उलट निवेदन द्यायला आलेल्या शिक्षकांना अत्यंत उद्धटपणे बोलून त्यांना अपमानित केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न ऐरणीवर घेऊन शिक्षकांनी महा विकास आघाडीच्या उमेदवाराकडे गार्‍हाने मांडून, गेल्या दहा वर्षात यासंदर्भात कोणतीच कारवाई झाली नसल्याने निदर्शने करून निषेध नोंदवत असताना, तुम्हाला भाजपने तरी काय दिले? असा प्रतिप्रश्न करताना तुम्ही भाजपकडेच जा. निवडणूक आहे म्हणून मी घाबरत नाही. असे उद्गार काढल्याने शिक्षक वर्गात विकास आघाडीच्या उमेदवाराबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत उमेदवाराचे विरोधात  या मतदारसंघात दोन वेळा भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उमेदवारी लढवलेले बंडखोर उमेदवार मैदानात असल्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार बनली आहे. सध्याच्या घडीला निश्चितपणे मतदार सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणुन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराकडे पाहत आहेत. असाही विश्वास निवृत्तीराव सांगवे (सोनकांबळे) यांनी व्यक्त केला आहे.