श्री पांडूरंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला वसा फटाके मुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा

.


उदगीर..... 


      उदगीर तालुक्यातील श्री. पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून व्हाट्सअप्प ग्रुप द्वारे कलाशिक्षक-नादरगे चंद्रदीप यांनी पर्यावरणपूरक आकाशकंदील कसे बनवावेत यासाठी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. त्याचबरोबर या वर्षी कोरोना या महाभयंकर व्हायरसने अनेक देशात थैमान घातले आहे. अनेक कुटुंबातील माणसांचे बळी घेतले आहेत. संपूर्ण विश्वात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव अजूनही सुरू आहे. एकाच्या नंतर एक बळींच्या संख्येचा आकडा अजूनही वाढतच आहे. देशात कोरोनाने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. गेली सात महिने कोरोनामुळे टाळेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे हातावर पोट घेऊन जगणारेही खूप मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा लोकांना मदतीचा हात देऊन ही दिवाळी सर्वजण फटाके मुक्त पर्यावरणपूरक साजरी करावी. कोरोना व्हायरस वर आपण विजय मिळविले असते तर ही दिवाळी आपण आनंदात साजरी केली असती. परंतु आज अनेक कुटुंबातील आनंद या कोरोना व्हायरसने हिरावून नेला आहे अशा परिस्थितीत आपण सर्वजण त्यांच्या दुःखात सामील व्हावेत आणि त्यांना धीर देऊन त्यांचे मनोबल,मनोधैर्य वाढवावेत. अशी माहिती विध्यार्थ्यांना दिली .या व्यतिरिक्त आपण अजून कोरोनाची ही लढाई जिंकलो नाही. त्यावर अजून औषध तयार व्हायचं आहे. यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे.      


 


          अनलॉक -5 अंतर्गत देशात व्यवहार सुरू झाले आहेत. थंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता आपण अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणत्याही समस्या या मानवासाठी पशु-पक्ष्यांसाठी आणि पर्यावरणासाठी खूप घातक असतात. त्यासाठी बालक, पालक, महिला, युवा तरुण गट आणि वृद्ध माणसांना माझी एकच विनंती आहे. दिवाळीत अनेक पाहुणे आपल्या घरी येतात. त्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीने मास्क चा नियमित वापर करावे. सतत स्वच्छता बाळगावी. हात नियमित साबणाने स्वच्छ धुवावेत. अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाताना मास्क घालून जावे आणि सुरक्षित अंतर पाळावे. या शासनाने सांगितलेल्या नियमांचे अगदी तंतोतंत पालन करावेत. आपल्या परिवारातील लोकांचा कोरोना पासून बचाव करावा. या महाभयंकर समस्येला संपुष्टात आणण्यासाठी विशेष काळजी घेऊन डॉक्टर, नर्स, पोलीस, प्रशासन, सफाई कामगार, शिक्षक, पत्रकार अहोरात्र मेहनत घेत आहेत. तरी शासनाने सांगितलेल्या सूचनेचे पालन करून राष्ट्रीय व देशहितासाठी कोरोनाच्या या लढ्यात प्रत्येक जण सहभागी व्हावे.


        


          त्याचबरोबर प्लास्टिकला आळा बसविण्यासाठी घरोघरी कागदी आकाश कंदिलाचा वापर करावा आणि कसल्याही प्रकारचे फटाके वाजवून प्रदूषण करू नये ही दिवाळी फटाकेमुक्त आणि पर्यावरण पुरक साजरी करावी. उच्च न्यायालयाने देखील या दिवाळीत फटाके फोडणे यावर निर्बंध घातले आहेत. अति प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट आले आहे. त्याचबरोबर अवतीभोवती असणाऱ्या पशु-पक्ष्यांना ही या फटाक्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो.फटाके पोळल्यामुळे लहान मुलांच्या शरीराला जखमा होतात. ध्वनिप्रदूषनही मोठ्या प्रमाणात होते.अशा परिस्थितीत आपण सर्वजण मिळून फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करून पैशाची बचत ही करू या..!यासंदर्भात कलाशिक्षक-नादरगे चंद्रदीप बालाजी यांनी विध्यार्थ्यांना माहिती दिली. या नाविन्यपूर्ण उपकर्माबद्दल संस्थेचे अध्यक्ष-गोविंदरावजी केंद्रे साहेब,सचिव-विनायकरावजी बेंबडे साहेब,मुख्याध्यापक-नादरगे एस.व्ही,तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे आणि कलाशिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.


Popular posts
कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* *विजयभैया राजेश्वर निटुरे*
Image
कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या पुण्यतिथी निमित्त नवनाथ गायकवाड मित्र मंडळातर्फे अन्नधान्य किट वाटप..
Image
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त राज्यस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
Image
“माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानांतर्गत बचतगटांमार्फत जनजागृती व लोकसहभागाला चालना - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर
Image
सावकारी परवाना नुतणीकरणाचे प्रस्ताव 31 डिसेंबर 2020 पर्यंत दाखल करावेत