प्रा. सिद्धेश्वर पटणे यांचा सत्कार संपन्न

.


उदगीर [प्रतिनिधी ] उदगीर येथील प्रसिद्ध इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस संचालक तथा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे उदगीर तालुकाध्यक्ष प्रा. सिद्धेश्वर पटणे यांची बसव बिग्रेडच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार शफी हाशमी यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीर शहराध्यक्ष समीर शेख यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते शफी हाशमी, साजिद खुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे उदगीर तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, शहराध्यक्ष प्रेम तोगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उदगीर शहर कार्याध्यक्ष आजम पटेल, सोनू हाशमी, नियाज शेख, शमशेर पठाण, सलीम शेख, ईस्माईल शेख, प्रशांत मोरे, अजित जाधव, सुलतान खान, दस्तगीर लासुणे, सामाजिक न्याय विभागाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गिलचे, तालुका सरचिटणीस किरण सूर्यवंशी, समाधान सूर्यवंशी, संतोष जाधव,दीपक गायकवाड, अजय जाधव, जैद शेख, ईरशाद बाणीकार, अमर कांबळे, रोहीत गवारे, फाजिल पठाण, यशवंत कांबळे, रोशन कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.