*एकंबेकर महाविद्यालयात कोविड योद्धांचा गौरव*

उदगीर : कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात कोविड योद्धांचा गौरव दि. 09/11/2020 रोजी ठीक 11:00 वा. महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्षा प्रा.सौ.लताताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे सचिव डॉ. विजयकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.


         कोरोना जागतिक महामारीच्या काळात उदगीर तालुक्यात कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे विविध क्षेत्रात रुग्णांची निस्वार्थ सेवा करणाऱ्यांचा गौरव महाविद्यालयात सौ.मृदुलाताई पाटील व प्राजक्ताताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.अनंत शिंदे(इतिहास विभाग प्रमुख), प्रा.जोगण मोरे (इंग्रजी विभाग प्रमुख), यांच्या विभागाच्या वतीने करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी प्राध्यापक वृदं व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा गौरव सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ओमप्रकाश क्षीरसागर यांनी दिली.