विरेश रमाकांत बारोळे यांनी अन्नदान करून शहरी बेघर केंद्रला साजरा केला वाढदिवस

.


उदगीर.... ..मा.विरेश रमाकांत बारोळे यांनी आपला वाढदिवस हा शहरी बेघर निवासी केंद्र उदगीर येथे नुकताच साजरा केलेला आहे.विरेश बारोळे यांनी आपला वाढदिवस हा स्वतःच्या घरी किंवा मित्र परिवारामध्ये थाटा- मटा मध्ये साजरा न करता हा वाढदिवस त्यांनी उदगीर येथील राहत असलेले शहरी बेघर निवासी केंद्र उदगीर येथे जाऊन त्यांच्यामध्ये साजरा केला.यावेळी येथे राहणाऱ्या बेघर लोकांना पोटभर जेवण देऊन त्यांनी हा वाढदिवस साजरा केला.त्यावेळी बोलताना ते म्हणाले की येणाऱ्या कालातील आनंदाचे उत्सव त्यांच्यात साजरे करू. व अश्या सामाजिक कार्यामध्ये आवड आहे असे ते म्हणाले.आणि असेच नवीन नवीन उपक्रम ते उदगीर शहरात सतत करत असतात.तसेच मा.विरेश रमाकांतजी बारोळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शहरातील गरजू लोकांना वस्त्रावाटप केले.कोरोनाच्या परिस्थिती मद्दे असंख्य लोकांच्या हाताचे काम गेले,येणाऱ्या दिवाळीमध्ये नवीन कपडे घेण्यासाठी सक्षम नसलेल्या ह्या गरजूंना त्यांनी कपड्याचे वाटप केले.आपल्या वाढदिवसानिमित्त इतरत्र कुठलाही खर्च न करता त्यांनी हा उपक्रम केला.ह्या उपक्रमात उदगीर येथील नामांकित डॉ.जेद हमजा सर, मा.अक्षय बिरादार,मा.शरद पाटील,सुधीर कांबळे,विठ्ठल लिंगोजी, औधुंबरजी कोरे,नितिन कांबळे, अभिषेक पत्तेवार, संजय दुरुगकर,रोहित भालेराव,गौस भाई,प्रा.फळटनकर सर,जगदीश अंकलगे,वैभव कनमुचके,आदी मान्यवर उपस्थित होते..