लातूर,.... जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यालय लातूर मार्फत दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी जागतिक एड्स दिना निमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई कार्यालयाच्या मार्गदर्शक सुचनानुसार एचआयव्ही/एड्स जनजागृतीकरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन 1 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये कोवीड-19 च्या मार्गदर्शक सुचनाचे पालन करुन करण्यात आले आहे.
यामध्ये ऑनलाईन स्पर्धा एक मिनिटाचा प्रचारात्मक व्हिडीओ, जीआयएफ/मीम्स सेल्फी विथ स्लोगन, मास्क डिझाईनिग, ऑन लाईन व्याख्यान, सेल्फी विथ पोस्टर प्रदर्शन व अतिजोखीम गटाचे संवेदीकरण इ.कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा व तालुकास्तरावर करण्यात आलेले आहे.
एचआयव्ही/एड्स बाबत व्यापक जनजागृती मोहिमेमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा तसेच आपली एचआयव्हीची स्थिती जाणून घेणेसाठी आयसीटीसीमध्ये जावून एचआयव्ही तपासणी करुन घ्यावी. आपल्या मनातील शंका-कुशंका बाबत टोल फ्रि 1097 या क्रमांकावर फोन करुन माहिती उपलब्ध् करुन घ्याकवी. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी केले आहे.
****