कै. रतनबाई कनिष्ठ महाविद्यालय व तांत्रिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन साजरा.

.


उदगीर/ प्रतिनिधी: येथील मराठवाडा ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ कल्लुर द्वारा संचलित कै.रतनबाई कनिष्ठ महाविद्यालय व तांत्रिक प्रशिक्षण संस्थेत भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. 


            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार सोमासे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मदनुरे रोहिदास, दैनिक.महिला एकजुट चे कार्यकारी संपादक भगवान सगर ,पत्रकार शंकर बोइनवाड, दयानंद उदबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .यावेळी प्रा.किशन सोमासे यांनी संविधानाचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजेंद्र सुगावे यांनी केले तर आभार प्रा.पवार ए. बी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.के.व्ही सोमासे, संजय यात्रे ,प्रा.टी.पी.कांबळे , गोविंद वाघमारे यांनी परिश्रम घेतले.