लोहारा येथे सेंद्रिय शेतमाल"विकेल ते पिकेल" विक्री योजनेचा शुभारंभ.

.


उदगीर..... तालुक्यातील लोहारा येथील प्रयोगशील शेतकरी श्यामभाऊ सोनटक्के यांच्या बळीराजा नैसर्गिक शेतकरी गटाने तयार केलेला विषमुक्त शेतमाल विक्री केद्राचे उदघाटन श्री. टी.एन.जगताप साहेब, कषि उप संचालक लातूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.या प्रसंगी त्यांनी केलेले देशी गायचे पालन,तांदूळ काढणी मशीन, लिबोंळी पावडर मशीन, जीवामृत,गोकपा अमत,नैसर्गिक किटकनाशक याची पाहणी केली. व श्यामभाऊ सोनटक्के यांनी राज्य स्तरावर नैसर्गिक विषमुक्त अन्न धान्य विक्री सुरु केल्या बद्दल कौतुक केले. तरुण शेतकरीनी शेती क्षेत्राकडे सकारात्मक दष्टीकोन ठेवून सेंद्रिय शेतीकडे वळून शेती मालावर प्रक्रिया करून थेट शेतकरी ते ग्राहक विक्री क्षेत्रात उतरावे असे आवाहन करुन कषि विभाग आपल्याला सहकार्य करायला तयार आहे, असे श्री. जगताप साहेब यांनी सागुन गोपालन, औषधीय वनस्पती, तेलबिया, सोयाबीन साठवन व विक्री,सेंद्रिय शेतीमाल ब्रँड या क्षेत्रात भरपूर वाव आहे. यासाठी शेतकरी व कृषी विभाग अधिकारी कर्मचारी यांनी समन्वय साधुन काम केले तर रचान्तमक काम उभे रहील असे मत व्यक्त केले.याप्रसंगी श्री. दत्तात्रय गवसाने साहेब, जिल्हा कषि अधिक्षक लातूर, श्री. तीर्थकर साहेब, उपविभागीय कषि अधिकारी उदगीर ,श्री. संजय नाबदे साहेब, तालुका कषि अधिकारी उदगीर,श्री. पाटील साहेब मंडळ कषि अधिकारी,श्री. जाधव कषि पर्यवेक्षक,श्री. अमोल पाटील कषि सहाय्यक करडखेल शेतकरी श्री. गुरनाथ हेरकर,पदमाकर मोगले,पंडित धनुरे,सदीप रक्षाळे,श्रीमंत बिरादार आदी उपस्थित होते.