कु.अस्मिता काटमपल्लेचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश

 .


उदगीर....... मराठा शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर अंतर्गत चालणाऱ्या श्री विश्वनाथराव चलवा प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. अस्मिता अमोल काटमपल्ले या विद्यार्थिनीने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 232 गुण घेऊन शिष्यवृत्ती धारक झाली आहे. तिच्या या उज्वल यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक महेश जगळपुरे, मुख्याध्यापिका श्रीमती शुक्ला शिवदे (पाटील), संस्थेचे अध्यक्ष देवीदासरावजी औट तसेच संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी तिचे अभिनंदन करून तिला पुढील भरभराटीस शुभेच्छा दिल्या असून शाळेतील इतर 16 विध्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेच्या या उज्वल यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.