अपसिंगेकर परिवाराचे ना.संजय बनसोडे यांच्याकडून सांत्वन

.


उदगीर (वार्ताहर)


       जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अनंत अपसिंगेकर यांच्या परिवाराचे ना.संजय बनसोडे यांनी सांत्वन केले.दिवंगत पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांनी पत्रकारांच्या संदर्भाने संकल्पित प्रश्न सोडविले जातील असे ना.संजय बनसोडे यांनी सांगितले .


     जेष्ठ पत्रकार अनंतराव अपसिंगेकर यांचे अलिकडेच निधन झाले.त्यांच्या स्नुषा सौ .सुनिता प्रशांत अपसिंगेकर यांचेही आकस्मिक निधन झाले.अपसिंगेकर परिवारावर कोसळलेल्या या दुःखद आपत्तीनंतर सांत्वन करण्यासाठी ना.संजय बनसोडे यांनी अपसिंगेकर यांच्या विवेकसिंधु या निवासस्थानी भेट दिली.त्यांनी अपसिंगेकर कुटुंबियाचे सांत्वन केले."तत्व व मुल्यांशी प्रामाणिक राहून अपसिंगेकर यांनी केलेले कार्य कायम स्मरणीय आहे " अशा शब्दांत ना.संजय बनसोडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .साहित्यिक धनंजय गुडसूरकर यांनी कै.अनंत अपसिंगेकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील,बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, जि.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील,पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे,पत्रकार व्ही.एस.कुलकर्णी सिद्धार्थ सुर्यवंशी,अॕड.पद्माकर उगिले, प्रा.प्रशांत अपसिंगेकर,प्रवीण अपसिंगेकर,शिवाजी महींद्रकर,आदी उपस्थित होते.