गौरव कोविड योद्धांचा सत्कार समारंभ संपन्न

.


उदगीर........ कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय, उदगीर येथे गौरव कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमात उदगीर शहरातील विविध क्षेत्रातील कोविड योद्ध्यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, व पुष्पहार देऊन, मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून झाली. यावेळी स्वागत गीत व कोविड गीताचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी माननीय, जवळकर एम. व्ही. हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले की, कोरोना हा आज कमी होताना दिसत आहे. परंतु कोरोनाच्या अनुषंगाने कोणीही भीती बाळगू नये. पण कोरोना 19 च्या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करावी. व प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. वेळोवेळी पोलीस प्रशासन व कोरोना संबंधी इतर सर्व विभागात सहकार्य करावे. एकमेकांच्या सहकार्याने व एकजुटीने कोरोनाचा नायनाट आपण करू शकतो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव माननीय, श्री. डॉ. विजयकुमार पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य अधिकारी माननीय, भारत राठोड, वैद्यकीय अधिकारी माननीय, डॉ. शशिकांत देशपांडे, डॉ. दत्ता पवार, प्रा. डॉ. दीपक बच्चेवार, मा. रामभाऊ मोतीपवळे, ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक अशोक घारगे, पत्रकार रामविलास नावंदर, संस्थेच्या कोषाध्यक्ष सौ.मृदुला पाटील, प्राजक्ता पाटील, उपस्थित होते. तर सत्कारमूर्ती म्हणून पोलीस काँ. शिवाजी केंद्रे, संतोष दुबळगुंडे, संगीता बोडके, तर वैद्यकीय विभागातील डॉ. सुप्रिया विभुते, डाँ. विशाल पाटील, सौ. चंद्रकला कातुरे, शंकर बिरादार, दत्तात्रेय सोनटक्के, अग्निशामक अधिकारी, विशाल अल्टे, पत्रकार सुधाकर नाईक, विद्यार्थी मुन्ना पवार, संदीप राठोड, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शिरसागर ओमप्रकाश, कर्मचारी व विद्यार्थीनी केले. सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख व आयोजक प्रा. डॉ. आनंत शिंदे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार इंग्रजी विभाग प्रमुख व आयोजक प्रा.जोगन मोरे, यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.