*महाराषट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिकच्या सिनेटवर डॉ.दत्तात्रय पाटील यांची निवड*

.


उदगीर(वार्ताहर):-


महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिकचे सिनेट(अधिसभा)सदस्य म्हणून महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटलचे प्राचार्य डॉदत्तात्रय विनायकराव पाटील यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे प्रथम कुलगुरू स्वर्गीय डॉ.दयानंद डोणगावकर यांच्यानंतर विद्यापीठाच्या महत्वपूर्ण प्राधिकरणावर काम करण्याची संधी प्राचार्य डॉ.पाटील यांना मिळाली आहे.


 


प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील हे महाराष्ट्र कौन्सिल आॕफ इंडिया इंडियन मेडिसिन,मुंबईचे उपाध्यक्ष असून नवी दिल्लीच्या भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे माजी सदस्य आहेत.याशिवाय आरोग्य विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रिक्लिनीकल अभ्यास मंडळाचे व नॕशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन,महाराष्ट्र चे ते माजी उपसचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.


 


उदगीरच्या रोटरी क्लबचे व मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष तथा निमाचे सचिव म्हणून त्यांची कारकिर्द संस्मरणीय अशीच राहिली आहे. विनाअनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांच्या संघटनेचे सदस्य व आयुर्वेद व्यासपीठचे सदस्य,नस्याचे सदस्य तथा लाॕयन्स सनरायझर्स चे सदस्य असलेल्या डॉ.पाटील यांनी उदगीर डॉक्टर्स असोशिएशनचे व महाराष्ट्र आयुर्वेद विद्यार्थी परिषदेचे सचिव म्हणूनही कार्य केले आहे.


 


सामाजिक उत्तरदायित्व व कर्तव्यपरायणता हा केंद्रबिंदू म्हणून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ.पाटील यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि चॅरिटेबल हॉस्पिटल, उदगीर च्या माध्यमातून सहकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह निरपेक्ष व निस्वार्थ भावनेतून अविरतपणे केलेले कार्य सुद्धा निश्चितपणे उल्लेखनीय असेच आहे.


 


अहर्निश सेवामहे या उक्तीप्रमाणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या अडीअडचणी मध्ये धावून जाऊन योगदान देण्याची मानसिकता बाळगणाऱ्या डॉ.पाटील यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरच्या विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलेले आहे


 


राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकात त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले असून उदगीरच्या आरोग्य,शैक्षणिक सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे.


 


प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील यांच्या निवडीने उदगीरचा सन्मान झाला असून त्यांच्या निवडीबद्दल बाळभगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब जाधव,सचिव आ.बाबासाहेब पाटील,कुलगुरू डॉ. मिलिंद म्हैसकर, भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्स चे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी,आमदार विक्रम काळे,आमदार शिरीषदादा चौधरी,विनाअनुदानित आयुर्वेद महाविद्यालयाच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आहेर,सचिव निशिकांत दादा पाटील,वैद्यकीय विकास मंचचे राजेश पांडे,महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ.आशुतोष गुप्ता, कुलसचिव डॉ.कालिदास चव्हाण,अधिष्ठाता डाॅ.श्रीकांत देशमुख,डॉ.सचिन मुंबरे, परीक्षा नियंत्रक डॉअजित पाठक निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य गिरीश मैन्दरकर,आयुर्वेद व्यासपीठचे डॉ.संतोष नेवपूरकर,बी.ए.एम.एस. ग्रॅज्युएट असोसिएशनचे डॉ. मांगिरीश रांगणेकर,डाॅ.यशवंत पाटील,डाॅ.अजित गोपछडे, तसेच संबंध भारतातील व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह उदगीर येथील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी आणि धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटलच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.