उदगीर येथील पेडल टू गो टीम चे सदस्य नाशिक ते आळंदी सायकलिंग राईड साठी रवाना

.


उदगीर ..... उदगीर येथून पेडल टू गो टीम चे सदस्य नाशिक ते आळंदी सायकलिंग राईड साठी रवाना झाले.नाशिक येथील प्रेरणा राईड ही नाशिक येथून आयोजित केली असून,ही दोन दिवसाची राईड दि.२१ नोव्हेंबर रोजी नाशिक येथून सुरू होईल व ती २२ नोव्हेंबर रोजी आळंदी येथे त्याची सांगता होईल.या राईड साठी जवळपास 90 सायकलिस्ट भाग घेत असून नाशिक पासून दूर उदगीर या 470 किमी दूर ग्रामीण भागातून सायकलिंग साठी जात असून त्याची विशेष नोंद नाशिक येथील आयोजकांनी घेतली आहे.या दोन दिवसात या सायकल स्वार जवळपास 212 किमी चे अंतर पार करणार आहेत.उदगीर च्या "पेडल टू गो" च्या टीम चे नेतृत्व अमोल घुमाडे सर करत असून त्यांच्या सोबत विकास बन,संदीप मद्दे,सुनील भुयारे,युवराज कांडगिरे आणि करण रेड्डी नागराळकर हे सहभागी होत असून त्यांनी पर्यावरण बचाव हा संदेश घेऊन ही सायकलिंग करत असल्याचे न्यूज २४ मराठी शी बोलताना नमूद केले.या राईड साठी उदगीर येथील अग्रगणी सामजिक संस्था टीम U यांच्या तर्फे मेडिकल किट डॉ. बालाजी बिरादार यांच्या हस्ते देऊन शुभेच्छा दिल्या.या टीम चे मनोबल वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन जात असलेल्या टीम चे कौतुक करून त्यांना शुभेच्छा संदेश दिला.उदगीर येथील सर्व क्रीडाप्रेमी या टीम चे मनोबल वाढवण्यासाठी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी राहुल अंबेसंगे,सतीश फुलारी,डॉ गजानन टिपराळे,प्रकाश चटनाळे,शिवाजी बिरादार,ब्रम्हा स्वामी,संदीप पाटील,प्रशांत रंगवाळ,राजेंद्र पटेल,प्रेमसागर गांजुरे,शिवकुमार उप्परबावडे,संदीप आडके,अमित मिंचे,सुरेश रेड्डी नागराळकर,श्रीनिवास रायचुरकर,प्रशांत गायकवाड इत्यादी क्रीडाप्रेमी उपस्थित होते.