कौळखेड येथे मासीक अनुभव मंटप उदगीरच्या वतीने व्याख्यानमालेचेआयोजन

.


उदगीर:..... मौजे कौळखेड येथे महाराष्ट्र बसव परिषद 91 वे पुष्प मासीक अनुभव मंडप उदगीर च्या वतीने आयोजित करण्यात आले.


सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मासीक अनुभव मंटप सचिव श्रीकांत पाटील, प्रा.दत्ता खंकरे, रमेश खंडोमलके उपस्थित होते.


तर प्रमुख वक्ते राजकुमार बिराजदार बामणीकर असून उपस्थितांना म.बस्वेश्वराचे आचार, विचार व बाराव्या शतकातील अनुभव मंटपाविषयी मार्गदर्शन करण्यात आले, याचबरोबर स्वातंत्र्यसैनिक अप्पारावजी पाटील यांचा अन्याय व जुलूमाविरुध्द लढाई याविषयी माहिती देण्यात आली.


कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.व्यंकटेश वटटमवार यांच्या तर्फे कोवीड प्रतिरोधक गोळ्या व प्रतिकारशक्ती वाढ आयुष काढाचे मोफत वाटप करण्यात आले.


.


या कार्यक्रमाचे आयोजन ल. कि. पाटील केले असून, कार्यक्रमास असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.